martala farm.jpg 
नांदेड

आता नवे संकट : सोयाबीन पिकावर पिवळी छटा

सकाळ वृत्तसेवा

मारतळा, (ता. लोहा, जि. नांदेड) : पेरलेले बहुतांश सोयाबीन उगवलेच नाही. त्यातून काही उगवलेले सोयाबीन पीक आता रोगाने पिवळे पडत आहे. याचा वाढीसह उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या अचानक झालेल्या रोगट बदलामुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटाची मालिका काही संपायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. मारतळा परिसरातील बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या अंतिम चरणात झाल्या, पण पुरेसा पाउस नसणे, जमिनीतील उष्णता व त्यात बियाणे कुजणे, तसेच आठ दिवसांनंतर बियाणे अंकुरलेच नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आणि बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे केल्या. 

हंगाम वाया जातो की काय
दुबार पेरणी झाली, त्यातच आता सोयाबीनवर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येत आहे. मारतळ्यासह कामळज, कौडगाव, नांदगाव, चिंचोली, येळी, हातणी, कापसी, वाळकी, गोळेगाव, पिंपळदरी येथील सोयाबीनची पाने पिवळी पडून गळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, ऐन वाढीच्या अवस्थेतच पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांतून हंगाम वाया जातो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यातही विशेष म्हणजे दुबार पेरणी केलेल्या शेतातही कमीअधिक प्रमाणात ही समस्या पाहावयास मिळत आहे.


कृषी विभागाकडून अन्नद्रव्य कमतरतेचा निर्वाळा
सध्या बऱ्याच भागात अशी समस्या दिसत असून जमिनीतील अन्नद्रव्य झिंक, फेरस आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे पडत असल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात येते. यासाठी झिंक, फेरस, सल्फर, मँग्नीज तसेच १९:१९:१९ पाण्यात विरघळणारे खत प्रतिपंप ५० -६० ग्रॅम व सोबत निंबोळी अर्काची फवारणी करण्याचे आवाहन कृषी सहायक गजानन ढाकणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT