नवरात्र

अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नवरात्रोत्सव केवळ एक दिवसांवर आला असून अंबाबाई मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता केली. त्यामुळे मूर्तीचे दर्शन सायंकाळी सातपर्यंत बंद राहिले. महासरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली. सायंकाळी साडेसातनंतर पुन्हा देवीची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली.

दरम्यान, दुर्गाज्योत नेण्यासाठी राज्यभरातून नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते मंदिरात येऊ लागले आहेत. मंदिरातून दुर्गाज्योत प्रज्वलित करून ती आपापल्या गावाकडे नेण्याची ही परंपरा यंदाही अनेक मंडळांनी जपली आहे. उत्सव काळात मंदिरात दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्याचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.

दर्शन मंडप व सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या मंडपाचे काम पूर्ण झाले असून आवश्‍यक तेथे विजेची उपकरणे बसवली जात आहेत. दर्शन मंडपात एलईडी स्क्रीनही बसवले जात असून पिण्याच्या पाण्याची सुविधाही येथे दिली जाणार आहे. अंबाबाई मंदिरासह तुळजाभवानी मंदिर, नवदुर्गा मंदिरातही तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, शहरातील उत्तरेश्‍वर पेठेत नवरात्रोत्सव मंडळांची संख्या अधिक असून येथेही मंडप उभारणीला प्रारंभ झाला आहे.  

भाविकांना आवाहन
श्री अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठापनेला तीनशे चार वर्षे पूर्ण झाली. २६ सप्टेंबर १७१५ ला सिधोजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीची प्रतिष्ठापना झाली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे 500 कोटींच्या नोटिशीला 26 पानी उत्तर; सतीश सालियान यांचे सर्व आरोप फेटाळले

IND vs WI: विराट कोहली ODI मालिकेसाठी भारतात पोहचला, विमानतळावरील Video Viral; जाणून घ्या सामन्यांचे वेळापत्रक

Pune Ganpati Visarjan : आवाजाची मर्यादा ओलांडल्यास ढोल-ताशा पथकांवर होणार कारवाई; १२० ठिकाणी ध्वनिपातळीचे सातत्याने निरीक्षण

Ausa News : मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला शेतकऱ्याने जीवन संपविल्याने लागले गालबोट; करपलेले सोयाबीन पाहून शेतकऱ्याने गमावला जीव

Marathi News Live Updates : राज्यातील दुष्काळावरून अभिजीत दिपकेंचा सरकारवर निशाणा; म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मृत्यूची वाट बघू नका’

SCROLL FOR NEXT