akkalkot
akkalkot 
पश्चिम महाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून दहा लाख रुपये शिष्यवृती

राजशेखर चौधरी

अक्कलकोट : अक्कलकोट शहर-तालुका क्षेत्रातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती पुढील शैक्षणिक वर्षापासून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून देण्यात येणार असल्याची घोषणा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले यांनी लोकमंगल समुहाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केली. अध्यक्षस्थानी युवा नेते रोहन देशमुख होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.

लोकमंगल बॅंक सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ जन्मेजय राजे भोसले यांच्या हस्ते श्री गणेशाचे पूजन करून करण्यात आला. या प्रसंगी लोकमंगल समूहांकडून विद्यार्थ्यांना सहा लाख रूपयांची शैक्षणिक मदत करण्यात आली.डाॅ. भारूड यांनी शैक्षणिक आर्थिक मदत उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला.गरीब गरजू विद्यार्थ्यांना ही मदत आयुष्यात यशोशिखराकडे नेणारी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. जन्मेजय राजे भोसले म्हणाले ना. सुभाष देशमुख यांनी नेहमीच समाजातील उपेक्षिताना गरीब गरजूना विविध उपक्रमातून मदत केली आहे करीत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन मी पुढील शैक्षणिक वर्षा पासून दहा लाख रुपयांची शिष्यवृत्ती गरीब गरजू विद्यार्थ्यांना देणार आहे.या कार्यक्रमाला अन्नछत्र सचिव शाम मोरे, सदस्य दत्तात्रय जाधव, फत्तेसिंह शिक्षण संस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अन्नछञ विश्वस्त संतोष भोसले तसेच प्रशांत साठे, बाळासाहेब देसाई-कुलकर्णी, अश्पाक काझी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT