10th class girl end her life study stress exam fear education police sangola
10th class girl end her life study stress exam fear education police sangola Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangola News : दहावीतील विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून परीक्षेच्या तोंडावर उचलले टोकाचे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Sangola News : अभ्यासाच्या तणावातून तसेच पेपर अवघड जाणार असल्याच्या चिंतेतून इयत्ता दहावीतील १६ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना लक्ष्मीनगर (ता. सांगोला) येथे ता. ११ रोजी घडली. ऋतुजा युवराज बाबर (रा. लक्ष्मीनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

फिर्यादी साधना नाथा साठे यांची बहीण पौर्णिमा युवराज बाबर या आपली दोन मुले ओम व साई, मुलगी ऋतुजा यांच्यासह लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास आहेत. ऋतुजा ही लक्ष्मीनगर येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. दरम्यान, लवकरच दहावीची परीक्षा  सुरू होणार असल्याने ऋतुजा अभ्यासाच्या तणावात होती.

ऋतुजाने मावशी साधना यांना फोनवरून दहावी परीक्षा जवळ आली आहे, मला पेपर अवघड जाणार असल्याची चिंता व्यक्त केली होती. यातूनच टोकाचा निर्णय घेत ऋतुजाने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऋतुजाची आई पौर्णिमा व आजी या दोघी कडलास येथे कामाला गेल्या होत्या. त्यांना ऋतुजाने गळफास घेतला असल्याचे समजताच पौर्णिमा यांनी बहीण साधना यांना फोन करून ऋतुजाला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले.

ऋतुजाला उपचारासाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.

ऋतुजाचे दोन्ही भाऊ घराबाहेर खेळायला गेले होती. काहीवेळाने दोघेही जेवणासाठी घरी आले. त्यावेळी दरवाजा उघडत नसल्याने त्यांनी फोन करून हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी साधना नाथा साठे यांनी सांगोला पोलिसांनी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT