islampur photo.jpg
islampur photo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे...इस्लामपूर परिसरात येथे 14 लाखाचा गांजा जप्त....दोघांना अटक 

पोपट पाटील

इस्लामपूर (जि. सांगली)-  वाळवा तालुक्‍यातील पेठ व तांदूळवाडी येथे इस्लामपूर पोलिसांनी छापा टाकून घरात साठा केलेला गांजा व दोन मोबाईल असा तब्बल 13 लाख 69 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुदाम काकासो बाबर (वय 50, रा. पेठ) व संतोष संभाजी तोडकर (वय 42, रा. तांदूळवाडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली. दोघांविरूद्ध हवालदार उत्तम माळी यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः पेठ येथील सुदाम बाबर हा विनापरवाना गांजा विक्री करत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पेठ येथे बाबरच्या घराला वेढा देऊन छापा टाकला. बाबर याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याच्या घणात 4 किलो 50 ग्रॅम वजनाचा 32 हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. त्याच्याकडे गांजा कोठून आणला, याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने तांदूळवाडी येथून संतोष तोडकर याच्याकडून गांजा आणत असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी तांदूळवाडी येथे तोडकरच्या घरावर छापा टाकला.

तेव्हा तोडकरच्या घरात तब्बल 166 किलो 11 ग्रॅम वजनाचा 13 लाख 28 हजार 880 रुपये किमतीचा गांजा मिळून आला. पोलिसांनी तो देखील जप्त केला. गांजा विक्रीप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. दोघांकडून दोन मोबाईलसह 13 लाख 69 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश भरते, प्रशांत देसाई, अमोल भिंगारदेवे, मिनाक्षी माळी, उमाजी राजगे यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT