152 gram panchayat election of snagali start coming soon in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

राजकीय हालचाली वाढल्या ; सांगलीत रंगणार 152 ग्रामपंचायतीत रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहिर केला आहे. प्रभागनिहाय आरक्षण काढण्यात आलेली आहेत. सरपंच पदाचे आरक्षणाची अद्याप प्रतिक्षा आहे. निवडणूक तयारीसाठी गावागावात हालचाली सुरु झाल्या आहेत. 
जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

मतदार यादीबाबत 7 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍यातील तहसिल कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. 

5 डिसेंबर शासकीय सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी तहसिल कार्यालयात विशेष कक्षाची व्यवस्था आहे. मुदत संपलेल्या 152 ग्रामपंचायतीत तासगाव तालुक्‍यातील सर्वाधिक 39, जत 30, मिरज 22, खानापूर 11, कडेगाव 9, आटपाडी 10, पलूस 14, कवठेमहांकाळ 10, शिराळा आणि वाळवा तालुक्‍यातील प्रत्येकी दोन ग्रामपंचायती आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT