16 year old school student died after drinking tree energy drink before exam  esakal
पश्चिम महाराष्ट्र

Energy Drink : परीक्षेआधी एनर्जी ड्रिंक घेतलेल्या तरुणांचा मृत्यू; कुटुंबियांच्या दाव्याने खळबळ

रोहित कणसे

सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका शाळकरी मुलाचा एनर्जी ड्रिंक घेतल्याने मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांचा मृत्यू हे पेय घेतल्याने झाल्याचा दावा कुटुंबीय करत आहेत.

वृषव अशोक राचगोंड असं मृत मुलाचं नाव असून वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. दरम्यान या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ताकत मिळावी यासाठी त्याला एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय होती. शनिवारी पेपर देण्याआधी त्याने सलग तीन पेय पिले होते. त्यामुळे वृषवला त्रास होऊन त्याला अचानक चक्कर आली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी या तरूणाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. साम टिव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सदर ताकत येण्याचे पेय हे फक्त २० रुपयांना मिळत होते. त्यामुळे अशा प्रकारचे पेय पिऊन मुलाचा जीव गेल्याच दावा कुटुंबीय करत आहेत. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान वैद्यकीय तपासणीनंतर तरुणांच्या मृत्यूमागील खरे कारण समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT