praniti shinde
praniti shinde 
पश्चिम महाराष्ट्र

दोन मंत्री अन्‌ बेवडा खासदार... : प्रणिती शिंदे

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार... नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दीक हल्ला चढविला. निमित्त होते प्रभाग सोळामध्ये आयोजिलेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे. 

खासदार बनसोडे यांनी चपळगावात केलेले वक्तव्य आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांचे कथित वक्तव्य चर्चेत असतानाच आमदार शिंदे यांचाही तोल सुटल्याची चर्चा रंगली आहे. 

नगरसेविका फिरदोस पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या विविध कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, माजी महापौर नलिनी चंदेले, शौकत पठाण यांची उपस्थित होती. 

आमदार शिंदे म्हणाल्या,"भाजप सरकार आल्यापासून गोरगरीबांची अडचण झाली आहे. कॉंग्रेसने सुरु केलेल्या प्रकल्पांची उद्‌घाटने करणे व त्याचे श्रेय घेणे इतकेच काम त्यांच्याकडून सुरु आहे. दोन मंत्र्यांचे एकच काम, भांडणे करा, एकमेकांचे गट सांभाळा एवढेच त्यांचे काम आहे. आयत्या बिळात नागोबा हीच त्यांची भूमिका आहे.'' 

सोलापूरकरांना सध्या जो अनुभव येत आहे, त्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे. चपळगावमध्ये खासदारांनीही असेच वादग्रस्त वक्तव्य केले होते. यापूर्वीही मी अनेकवेळा त्यांच्यावर अशा पद्धतीने टिका केली आहे, त्यात नवीन काही नाही. 
- प्रणिती शिंदे, आमदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT