संगमनेर - सर्व निकषांची 30 सप्टेंबर 2019 मध्ये पूर्ती करणाऱ्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली.
जाणून घ्या - विषय संपला, इंदोरीकरांचा तो व्हिडिअोच डिलीट
निकष पूर्ण करणाऱ्यांना लाभ
ते म्हणाले, ""राज्यातील शाळांना अनुदानित करण्यासाठी "कायम' शब्द वगळला गेला. निकषांची पूर्तता करणाऱ्या, कायम विनाअनुदानित तत्त्वावर परवानगी दिलेल्या व अनुदानास पात्र घोषित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकमधील जादा तुकड्या व अतिरिक्त शाळांना 20 टक्के अनुदान उपलब्ध करण्याची विधान परिषदेत केलेली पुरवणी मागणी मान्य करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घेतला आहे.''
१०६ कोटींचा खर्च
सुमारे 106 कोटी 74 लाख 72 हजार रुपये एवढा खर्च त्यासाठी अपेक्षित आहे. तो चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविणे शक्य होणार आहे, असे डॉ. तांबे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.