31 december party Sakal
पश्चिम महाराष्ट्र

थर्टी फस्टला नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई; विक्रम आमटे

राज्य सरकारने थर्टी फस्टसाठी जारी केलेल्या नियमावलींची पोलिसाकडून कटाक्षाने अंमलबजावणी केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राज्य सरकारने थर्टी फस्टसाठी (31st December) जारी केलेल्या नियमावलींची पोलिसाकडून (Police) कटाक्षाने अंमलबजावणी केली जाणार आहे. कोणीही याचे उल्लंघन केल्यास संबधीतावर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी इशारा पोलीस उपआयुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे.

मंगळवार (ता.२८) त्यांनी आपल्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. नवीन नियमावलीनुसार सर्व नागरिकांनी हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबसह ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होणार आहे, त्याठिकाणी स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एसीपी दर्जाचे अधिकारी भेट देऊन त्याठीकानी नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी करणार आहेत.

थर्टी फस्टसाठी ३० ते २ जानेवारी पर्यंत ही नियमावली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, क्लबसह इतर सार्वजनिक ठिकाणी मर्यादेपेक्षा ५० टक्केच लोकांना प्रवेश देण्यात यावा. एखादा वेळेस या नियमाचे उल्लंघन करून जास्त लोकांना जमविल्यास संबधित मालक, संस्थाचालकांना जबाबदार धरण्यात येईल. त्याच बरोबर सभा समारंभ व लग्नाच्या ठिकाणी केवळ ३०० लोकांची उपस्थिती असली पाहिजे. यापेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

बेळगाव शहर आणि जिल्हा महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने राज्यात प्रवेश करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी बाची, चलवेनट्टी, राकस्कोप, बेक्कीनकेरे या ठिकाणी चेक पोस्ट सुरू आहेत. कर्नाटकात प्रवेश करायचा असल्यास संबंधिताकडे कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणि दोन डोस घेतलेले सर्टिफिकेट असले पाहिजे. त्या ठिकाणी महसूल, आरोग्य आणि पोलिस खात्याचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.

आज पासून नाईट कर्फ्यु जारी झाला असला तरी बस, रेल्वे आणि विमान सेवा मात्र सुरू राहील. खाजगी वाहनांना कोणत्याही कारणावरून रस्त्यावर फिरता येणार नाही. लग्न समारंभ आणि अंत्यसंस्कारासाठी बाहेर पडणाऱ्यानी स्पष्ट माहिती दिली पाहिजे. त्याचबरोबर त्याने आरपीपीसीआर निगेटिव्ह अहवाल आणि दोन डोस घेतलेले सर्टीफिकीट जवळ ठेवले पाहिजे. आपत्कालीन वेळेस बाहेर पडण्यास हरकत नाही, मात्र विनाकारण थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी जात आहे. किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी जात आहे. अशी कारणे सांगणाऱ्या कोणत्याही प्रकारे अवकाश देण्यात येणार नाही. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधून नीटचा पेपर फुटला, अहिल्यानगरच्या आणखी एकाला अटक; पुणे कनेक्शन आलं समोर

Gold Rate Today: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव भडकले! अवघ्या 10 तासांत 14 हजारांची वाढ; काय आहे ताजा भाव?

Latest Marathi News Live Update : नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयची अहिल्यानगरमध्ये कारवाई

Yogi on Pratik Yadav: प्रतीक यादव यांच्या निधनावर योगी आदित्यनाथ भावूक; यादव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत व्यक्त केल्या सहवेदना!

'अरे हा तर सेम मकरंद अनासपुरे सारखं करतोय' साईराज आणि पूर्वा शिंदेचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT