पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात दिवसात ५८ मिलिमीटर पाण्याची वाफ

सुधाकर काशिद

कोल्हापूर - उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. दुपारभर उष्णतेच्या लाटा आहेत. या वातावरणात लोक हैराण झालेत, हे खरे आहे; पण त्याहीपेक्षा उन्हाच्या तडाख्याने पाणवठ्यावरील पाण्याची होणारी वाफ चिंतेची बाब ठरली आहे. कारण कोल्हापूर परिसरात हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेल्या काही दिवसांत २४ तासांत ५८ मिलिमीटर पाण्याची वाफ होऊन जाईल इतका उन्हाचा तडाखा वाढला आहे. काही वर्षांपूर्वीच्या नोंदीनुसार ही पातळी सात ते आठ मिलिमीटरने वाढली आहे. 

एखाद दुसरा वळवाचा पाऊस न होता उन्हाचा तडाखा पुढे असाच वाढला, तर पाणीसाठ्यावर त्याचा परिणाम होणार हे स्पष्ट आहे. ताराराणी चौकात असलेल्या हवामान (मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया) विभागाच्या कार्यालयात उष्णता, पाऊस, वाऱ्याचा वेग, आर्द्रता मोजणारी उपकरणे आहेत. दिवसातून चार वेळा त्याचे मोजमाप केले जाते व त्याचा अहवाल दिल्लीला पाठवला जातो.  

उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याची प्रतीकात्मक मोजणी करण्यासाठी उपकरणे या कार्यालयाच्या आवारात आहेत. यावर्षी काही दिवसांपूर्वी २४ तासांत ५८ मिलिमीटर पाण्याची वाफ झाल्याच्या नोंदी आहेत.
- राजेंद्र घाटगे,
हवामान तंत्रज्ञ, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांत कोल्हापूर परिसरातील तापमान सलग किंवा एक-दोन दिवसाआड ४१.५ आहे, ते सरासरी ३८ आहे. यापूर्वी एखादा दिवस तापमान ४१.०५ पर्यंत जायचे; पण एप्रिल व मेमध्ये पाच ते सहा दिवस तापमान ४१.५ पर्यंत राहिले. उन्हाचा तडाखा म्हणजे काय असतो, हे लोकांनी अनुभवले. अर्थात उन्हाच्या या तडाख्याचे पाणीसाठ्यावर होणारे परिणाम हवामान विभागात पडताळले गेले; तेव्हा उन्हामुळे पाण्याची वाफ २४ तासात ५८ मिलिमीटर असल्याचे स्पष्ट झाले.

ही पातळी या वर्षाची सर्वोच्च पातळी आहे. छोटे-छोटे पाणवठे यामुळे कोरडे पडण्याची मोठी भीती आहे. उन्हाळ्यात एखाद दुसरा मोठा वळवाचा पाऊस झाला, तर पाणीपातळी पूर्ववत होऊ शकते; पण मे संपत आला. यंदा मॉन्सूनही लांबणार आहे. वळवाचीही यंदा दांडी आहे. त्यामुळे चिंतेत भरच पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर नाशिकचा तिढा सुटला! शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

SCROLL FOR NEXT