miraj lab.jpeg
miraj lab.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना रुग्णालयासाठी डिपीसीतून 78 लाखांचा निधी 

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्‍यक असणाऱ्या साधन सामग्रीसाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत जिल्हा प्रशासनाने 77 लाख 71 हजार 860 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. 


कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याला आवश्‍यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असा दिलासा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिला होता. जिल्ह्यात ज्या वैद्यकीय साधन सामग्रीची आवश्‍यकता आहे, अशांचा आढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून प्रशासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना 77 लाख 71 हजार 860 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. निधीतून व्हेंटीलेटर, मल्टी पॅरा मॉनिटर, ईसीजी मशिन, सक्‍शन मशिन, टोक्‍लेव्ह मशिन, आरओ प्लॅंट, स्टीम स्क्रबर मशिन, बॅटरी स्प्रेअर वुईथ फ्रॉगर मशिन, एन-95 मास्क, लॅटेक्‍स हॅंडग्लोज, गॉगल्स, पीपीई कीट आदी अद्ययावत साधन सामग्री खरेदी करण्यात येणार आहे.

तसेच टोमेटेड न्युक्‍लिक सीड एक्‍सट्रॅक्‍शन सिस्टीमसाठी 14 लाख 87 हजार रुपयांची मागणी प्रस्तावीत आहे. वैद्यकीय साधन सामग्रीमुळे कोरोना बाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. अधिक सक्षम होणार असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी व्यक्त केले. जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता करून दिल्याबद्दल मिरज वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबईच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी पालकमंत्री व प्रशासनाने आभार व्यक्त केले आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT