पश्चिम महाराष्ट्र

नवरदेव 79 वर्षांचे, नवरी 66 ची; अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा

अजित झळके

नवरदेव आहेत ७९ वर्षांचे आणि नवरी आहे ६६ वर्षांची. मिरजेतील बेघर निवारा केंद्रात हा आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.

सांगली : जीवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरून सारे पुढे-पुढे चालावे... किती अर्थ आहे या शब्दांत. संकटांची मालिका या आयुष्यात येत असतेच, पण ती मागे सोडून आयुष्यात एकमेकाला साथ देत पुढं जायचं असतं. अशीच साथ आयुष्याच्या उतारवयात देण्याची शपथ घेत एका जोडप्याने सप्तपदी पूर्ण केली. नवरदेव आहेत ७९ वर्षांचे आणि नवरी आहे ६६ वर्षांची. मिरजेतील बेघर निवारा केंद्रात हा आगळा वेगळा विवाह सोहळा संपन्न झाला.

शालन या बेघर केंद्रातील आश्रित. त्यांच्या पतीचे आणि मुलाचे अकाली निधन झाल्यानंतर जीवनाची फरफट सुरु होती. बेघर केंद्रात आधार शोधत त्या आल्या आणि येथेच राहिल्या. निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हे 79 वर्षांचे. त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मुलांचे विवाह झाल्यानंतर ते आपापल्या प्रपंचात रमले. दोनवेळचे अन्न शिजवायला आधार नवता. कुणाशी बोलावं तर हक्काची माणसं नवती. त्यामुळे त्यांनी आयुष्याची ही संध्याकाळ कुणासोबत तरी रम्य करावी, असा निर्णय घेतला. पुढील आयुष्याबाबत निर्णय घेताना मुलांशी चर्चा केली. त्यांना या नव्या जीवनाची सोबती बेघर केंद्रात सापडली.

एकमेकांचे विचार सुख दुःख वाटून घ्यायचा निर्णय घेतला. मुहूर्त ठरला. पाहुणे बेघर केंद्रातील समदुःखी महिला. वधू शालिनी या पाषाण (पुणे) येथील आणि साळुंखे हे कवठेएकंद (ता. तासगाव) येथील रहिवासी. या ज्येष्ठ वधू-वरांचे समुपदेशन करण्यात आले. उज्वल भविष्यातील वाटचाल एकमेकांनी समजून घेऊन व्यतीत करायचं ठरलं. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडले. समाज सुधारक सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या फोटोला पुष्पहार व वृक्षाला पाणी घालून, फुलांच्या अक्षदा टाकण्यात आल्या. परंपरेने चालत आलेल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण व कालबाह्य झालेल्या पद्धतीला फाटा देऊन, वयाचे बंधन झुगारून, पार पडलेल्या विवाह सोहळ्याची सगळीकडे चर्चा आहे.

मिरजेत दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या आस्था बेघर महिला निवारा केंद्राच्या प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे, केंद्र संचालिका सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, अश्विनी नागरगोजे, रूपाली काळे, प्रतिभा भंडारे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शेडगे, सुरेश बनसोडे, सविता काळे, पूजा मोहिते यांनी विवाह सोहळ्याचे नियोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT