Gajendra Sangli e sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत दीड टन वजनाचा रेडा, किंमत ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का

सकाळ डिजिटल टीम

सांगली : सध्या सांगलीमध्ये एका रेड्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील तासगाव (Tasgaon Sangli) येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये हा रेडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. कारण, या रेड्याचं वजन १.५ टन असून त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. या रेड्याचे नाव गजेंद्र असून त्याची किंमत तब्बल ८० लाख रुपये आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १६ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरील मंगसुळी गावातील शेतकरी विलास नाईक यांच्याकडील हा गजेंद्र नावाचा रेडा आहे. गजेंद्रचा दररोजचा खुराक म्हणजे त्याला दिवसाला 15 लिटर दूध, बक्कळ ऊस, गवत आणि इतर खाद्य लागते. नाईक यांच्या घरच्या गीर म्हशींचा हा रेडा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी हजारो किलोमीटरवरून लोक येत आहेत. तर, या गजेंद्र ला तब्बल 80 लाखाला मागणी सुद्धा आली होती. पण, मालकांनी घरची पैदास असल्याने गजेंद्रला विकले नाही. आतापर्यंत गजेंद्रला कर्नाटकसह चार प्रदर्शनात मालकाने नेले होते आणि आज सांगलीच्या तासगाव येथे शिवार प्रदर्शनात तो आला आहे आणि खास आकर्षण बनला आहे.

हा रेडा आमच्या शेतीची शान बनला आहे. अशा रेड्यांना वाढविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, त्यापासून तयार होणारे जीव हे चांगल्या दर्जाचे असतात. या शेतकऱ्याकडून प्रेरणा घेऊन आमच्या जिल्ह्यातील इतर शेतकरी जनावरांचे निरोगी संगोपन करतील. त्यामुळे त्यांना चांगलं उत्पादन देखील मिळेल. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असा विचार करून पशुसंवर्धन करणे गरजेचे झाले आहे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT