पश्चिम महाराष्ट्र

अपेक्स प्रकरण विधानसभेच्या पटलावर मांडणार; देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

सांगली: तब्बल 87 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मिरज येथील अपेक्स रुग्णालय प्रकरणी विधानसभेत आवाज उठवावा, यासाठी आज येथील भाजप नेत्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची मुंबईत (mumbai)भेट घेतली. फडणवीस यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती घेताना धक्का बसला आणि त्यांनी हे प्रकरण विधानसभेत ताकदीने मांडू अशी ग्वाही दिली. आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, (Gopichand Padalkar)आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत, (Sadabhau Khot) अश्रफ वांकर, रवींद्र ढगे ,दीपक माने यांनी देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली. (87-covid-infected-died-apex-hospitals-case-bjp-leaders-met-devendra-fadnavis-in-mumbai-sangli-news)

मिरज येथील अपेक्स रुग्णालयामध्ये 207 कोरोना बाधित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी सर्वांसाठीच धक्कादायक होती. या रुग्णांवर योग्य उपचार केले गेले नाहीत. त्यांच्या बाबत अक्षम्य अशी हयगय केली गेली. मृत्यूचे आकडे लपवले गेले. या रुग्णालयात रुग्ण दाखल व्हावेत यासाठी एक साखळी तयार केली.अशी अनेक प्रकरणे या निमित्ताने समोर आली आहेत. रुग्णालयाचा प्रमुख डॉक्टर महेश जाधव याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्यासह अन्य कर्मचारी आणि डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आणि 87 रुग्णांचा बळी गेला असल्यामुळे दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. विधानसभेच्या पटलावर हा विषय आल्यानंतर तपासाला अधिक वेग येईल आणि दोषी डॉक्टर सह या प्रकरणांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिका यंत्रणा आणि काही अधिकाऱ्यांच्या विरोधातला फास आवळला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT