PHOTO-2020-05-13-16-53-12.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

कामेरीतील 94 वर्षाच्या  आजींची कोरोनावर मात; मिरज कोरोना रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्‍टर-नर्स यांच्याकडून टाळ्या वाजून शुभेच्छा 

सकाळवृत्तसेवा

सांगली : कामेरी येथील 94 वर्षाच्या आजींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मिरज कोरोना रुग्णालयातुन करोनामुक्त 94 वर्षीय आजीला डिस्चार्ज दिला आहे. यावेळी डॉक्‍टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवत शुभेच्छा देत डिस्चार्ज देण्यात आला. 

सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 94 वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. 

शासकीय रुग्णालयातील डॉक्‍टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफ कडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले. त्यांची काळजी घेण्यात आली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे 94 वर्षे कोरोना मुक्त झाल्या. आयसोलेशन कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसानंतर आजींची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. दोन टेस्टमध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. या आजीस रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

यापूर्वी सुद्धा मिरजेतील कोरोनाच्या रुग्णालयात दोन वर्षाच्या कोरोना पॉझिटिव्ह बाळावरही यशस्वी उपचार करून त्यालाही कोरोनामुक्त करण्यात आले आहे. 

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नंदकर म्हणाले,""सर्वच रुग्णांना या हॉस्पिटलचे डॉक्‍टर्स व सर्व स्टाफ अत्यंत चांगल्या प्रकारे व गुणवत्तापूर्ण सेवा देतात. रुग्ण हा केंद्रबिंदू समजून सेवा दिली जाते. जिल्हा प्रशासन व कोविड हॉस्पिटल यांच्यात अत्यंत चांगला समन्वय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.'' 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज हे कोरोना हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले असून या हॉस्पिटलने आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी अत्यंत नेटके नियोजन आहे. 94 वर्षाच्या आजीबाईंना या हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने अत्यंत भक्तीभावे सेवा दिली असून आता त्यांची तब्येत स्थिर आहे.

इथून पुढेही 14 दिवस त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असून त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी स्पष्ट केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी भूपाल गिरीगोसावी, डॉ रुपेश शिंदे, एम. एस. मूर्ती, वंदना शहाणे यांच्यासह सर्व डॉक्‍टर नर्स आणि कर्मचारी उपस्थित होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT