ACBs moving office proposes to stop the bribe
ACBs moving office proposes to stop the bribe 
पश्चिम महाराष्ट्र

'एसीबी'च्या फिरत्या कार्यालयाचा प्रस्ताव; लाचखोरी रोखणार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : लाचखोरी रोखण्यासाठी शासन पातळीवर प्रबोधनासह वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात जाऊन तिथे तक्रारी नोंदवून घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) फिरते कार्यालय सुरू करण्याचा विचार आहे. त्याअनुषंगाने प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती एसीबी सोलापूर विभागाचे प्रमुख, सहायक पोलिस आयुक्त अजितकुमार जाधव यांनी सांगितले.

सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांची मुंबई कार्यालयात बदली झाली आहे. सोलापूर एसीबी सोलापूर विभाग कार्यालयाचे प्रमुखपदी मुंबईहून सहायक पोलिस आयुक्त जाधव यांनी पदभार स्वीकारला आहे. रविवारी जाधव आणि देवकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सहायक पोलिस आयुक्त जाधव यांनी आजवर मुंबई, सोलापूर शहर, कोल्हापूर, नवी मुंबई, सांगली पोलिस प्रशिक्षण केंद्र, मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात सेवा बजाविली आहे. ते म्हणाले, "एसीबीचे फिरते कार्यालय हे चारचाकी वाहनात असेल. वाहनामध्ये बसण्यासाठी खुर्च्या असतील. लॅपटॉपवर तक्रार नोंदवून घेण्यासाठी छोटे टेबल, प्रिंटर असेल. ज्या कार्यालयासंबंधी तक्रार आहे त्याठिकाणी तक्रारदाराला बोलावून त्याची तक्रार नोंदवून घेतली जाणार आहे. यामुळे तक्रारदाराचा वेळ वाचेल. महाराष्ट्रात असा प्रयोग अद्याप कोठे चालू झालेला नाही. मावळते सहायक पोलिस आयुक्त अरुण देवकर यांनी प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.''

"सोलापुरातील कालावधी चांगला गेला. गेल्या तीन वर्षांत लाचखोरीच्या प्रकरणात विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई करण्यात आली. लाचप्रकरणात कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांची संख्या 24 इतकी आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडून फिरत्या कार्यालयासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी लाचेच्या तक्रारी नोंदवून घेण्यासाठी अत्याधुनिक असे कार्यालय जिल्हा नियोजन मंडळाच्या सहकार्यातून बांधण्यात आले आहे,'' असे मावळते सहायक पोलिस आयुक्त देवकर यांनी सांगितले.

कोणत्याही ठिकाणी शासकीय काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असेल तर तत्काळ एसीबीकडे तक्रार करा. विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात जाऊन लाचेसंबंधी तक्रारी नोंदवून घेण्यासाठी एसीबीचे फिरते कार्यालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा नियोजन मंडळकडून निधी उपलब्ध झाल्यास या उपक्रमाला लवकरात लवकर सुरवात होईल. - अजितकुमार जाधव, सहायक पोलिस आयुक्त, एसीबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT