Accident injured in Mahu Tulshi Ghat Sakal
पश्चिम महाराष्ट्र

माहू - तुळशी घाटातील अपघातात ६ जण जखमी

टक्कर देवून ट्रॅव्हलर गाडी पसार; चालक अर्धातास गाडीत अडकून

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड :तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर माहू- तुळशी घाटात एका वळणावर टाटा मॅजिक आयरीस गाडीला जोरदार ठोकर मारून टेम्पो ट्रॅव्हलर ही गाडी पसार झाल्याची घटना ता.१७ मार्च रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातामध्ये 6 जणाना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बाणकोट येथील शेहरान सोलकर हे आयरिश गाडी घेऊन मंडणगडकडे येत असताना तुळशी घाट येथे टेम्पो ट्रॅव्हलर गाडीने त्यांना जोरदार धडक देऊन अपघात घडला. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलर घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे. त्याचा मंडणगड पोलीस तसेच नागरिक त्या टेम्पो ट्रॅव्हलरचा शोध घेत आहेत. अपघातामध्ये चालक सोलकर हे गाडीचे स्टिअरिंग मध्ये अडकून पडले होते. धडक एवढी जोरदार होती की गाडीचा पुढचा भाग दबून त्यात चालक अडकून सोलकर अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच मंडणगड शहरातील जागरूक नागरिकांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. अर्धा तास चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. शीगा व पारय यांच्या साह्याने गाडीचा पत्रा बाजूला करून सोलकर यांना बाहेर काढण्यात आले. सोलकर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर तुळशी येथील कृष्णा करावडे, त्यांची पत्नी रिया करावडे, त्यांची सहा वर्षाची मुलगी आराध्या करावडे व गोपाल करावडे यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तसेच अन्य एक नागरिक जखमी झाले आहेत. चालक व त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी खेड, चिपळूण येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT