पश्चिम महाराष्ट्र

मिरज - पंढरपूर महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

सकाळवृत्तसेवा

शिरढोण -  शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील मिरज - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी व ट्रकचा अपघात झाला आहे. यात दुचाकीस्वार ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. तौशिफ इब्राहीम बानदार ( 32, रा. लक्ष्मी मार्केट मोमिन गल्ली मिरज ) असे ठार झालेल्या युवकाचे नांव आहे. तर अमिन सलाती व हुजेफ बाणदार अशी जखमीची नांवे आहेत.

हा अपघातात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.  याची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे. तौशिफ बानदार त्यांचा लहान मुलगा हुजेफ बानदार व आमिन सलाती हे मोटर सायकल क्रमांक (एम. एच. 10 बी. एस. 6950) वरून ढालगांव (कवठेमहांकाळ) येथील इज्तेमाला निघाले होते. शिरढोणमधून बाहेर रस्त्यावर येत असताना पाठी मागून आलेल्या ट्रकची (एम. एच्य.10 ए क्‍यु 2736) त्यांच्या मोटारसायकलला  जोराची धडक बसली. धडकेनंतर बानदार हे खाली पडले. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने व डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच ठार झाले. तर हुजेफ बानदार, आमिन सलाती दोघेही हे गंभीर जखमी झाले. या जखमींना मिरज येथील मिशन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT