Accident On Panhala Road 12 Students Injured
Accident On Panhala Road 12 Students Injured  
पश्चिम महाराष्ट्र

विट्यातील सहलीच्या बसचा ब्रेक फेल झाला अन्...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - दानेवाडी (ता. पन्हाळा) येथे सहलीला गेलेल्या बसचा ब्रेक निकामी झाला. चालकाने प्रसंगावधान राखून ही बस कठ्ठड्याला धडकली व उलटली. यात वीटा (सांगली) येथील इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेच्या 12 विद्यार्थींनीसह दोन शिक्षक जखमी झाले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. आमदार सुमन पाटील यांनी जखमीं विद्यार्थी व शिक्षकांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. 

जखमींची नांवे - निमिशा विजय साळुंखे (वय 10, मादळमुटी), अंजली निवास कांबळे (वय 15, रा. वीटा सावरकर), पूजा किसन जगताप (वय 15, भाग्यनगर), गौरी चंद्रकांत पाटील (वय 15), तन्मयी तुकाराम साठे (वय 15), पायल प्रमोद खांडेकर (वय 14, सर्व रा. वीटा), इशीता तुकाराम यादव (वय 1515, नागेवाडी), सृष्टी सुनील जाधव (वय 15, रा. कारवे), प्रिती संभाजी मोरे (वय 15, आम्रापूर), ज्योती सतिश सपकार (वय 15, रा. वीटा), ऋतुजा शशिकांत जाधव (वय 15, रा. कार्वे), या विद्यार्थींनीसह स्वागत धर्मराज कांबळे (वय 28, रा. कागल), शिक्षका कविता वैभव कुपार्डे (वय 32, रा. वीटा), शिक्षक गोविंद मधुकर धर्मे (वय 36, रा. देशींग) अशी आहेत. 

बसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, सांगली शिक्षण संस्थेच्या वीटा येथील इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेची आज जोतीबा, पन्हाळा आणि कणेरीमठ अशी सहल काढण्यात आली होती. तीन एसटीबसमधून विद्यार्थींनी घेऊन पाच शिक्षक सकाळी बाहेर पडले. सकाळी साडेनऊच्या सुमारास विद्यार्थ्यांनी जोतीबा मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पन्हाळाच्या दिशेने तिन्ही एसटीबस निघाल्या. दानेवाडी (ता. पन्हाळा) येथे यातील एका बसचा ब्रेक निकामी झाला. यात चाळीस विद्यार्थींनीसह शिक्षक होते. एकाबाजूला खोल दरी असल्याने चालकाने प्रसंगावधान राखून ही बस रस्त्याच्या बाजूच्या कठ्ठड्यावर घातली. तशी ती पलटी झाली. यातील विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. अचानक झालेल्या अपघातामुळे बसध्ये विद्यार्थींनी ओरडा केला. पाठीमागून येणाऱ्या शाळेच्या एसटी बसच्या हे लक्षात आले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. दरम्यान नागरिकांनी याची माहिती 108 रुग्णवाहिकेला दिली. जखमी विद्यार्थींनीना उपचारासाठी तातडीने सीपीआरमध्ये पाठविण्यात आले. त्यांच्यावर तेथे तातडीने उपचार करण्यात आले. जखमी विद्यार्थींनीसह शिक्षकांना तोंडाला, हाता पायाला किरकोळ दुखापत झाली. त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

कोडोली पोलिसात नोंद

दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच आमदार सुमन पाटील यांनी सीपीआरला भेट दिली. त्यांनी जखमी विद्यार्थींनीची विचारपूस केली. तसेच अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबीये यांच्याकडून सुरू असलेल्या उपचाराबाबतची माहितीही घेतली. याबाबतची प्राथमिक नोंद सीपीआर चौकीत झाली असून कोडोली पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते. 

पालकांच्यात भितीचे वातावरण... 

सहलीच्या बसला अपघात झाल्याचे समजताच पालकांनी विद्यार्थींनीची चौकशीसाठी फोनाफोनी सुरू केली. त्यामुळे शिक्षकांचे एकसारखे फोन खणाणत होते. सर्व मुलींची प्रकृती ठिक आहे. किरकोळ दुखापत आहे असे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT