accident sangli nerle one injured
accident sangli nerle one injured 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली  : नेर्लेत भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

नेर्ले (जि. सांगली)- येथील महामार्गावर दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाला. महादेव गुलाब भोरे  (वय, ४५ रा. माळेवाडी  तालुका पाथरी जिल्हा परभणी) असे गंभीर जखमी झालेल्या ऊसतोड कामगाराचे नाव आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महादेव भोरे हे ऊसतोड कामगार म्हणून परिसरात काम करतात. ते दुपारी बाराच्या दरम्यान दुचाकी (क्रमांक एम एच २२ए बी २१७५) वरून काळमवाडीच्या दिशेने आशियायी महामार्ग ओलांडून नेर्लेकडे येत होते. मुख्य चौकाकडे जात असताना कोल्हापूरहून भरधाव वेगाने कराडकडे जाणाऱ्या चार चाकीने (क्र.एम एच १४ एच के ९५३३) महादेव भोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या धडकेत भोरे महामार्गावर आपटल्याने त्यांच्या कानाला, खांद्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ॲम्बुलन्स बोलवून तात्काळ इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

कार चालक बाळू कोंडीबा गुंजाळ (रा. पुणे )हे स्वतःहून कासेगाव पोलिसांत हजर झाले व त्यांनी अपघाताची फिर्याद दिली. महादेव गुलाब भोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची नोंद कासेगाव पोलिसात झाली आहे.  

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT