solapur
solapur 
पश्चिम महाराष्ट्र

पहिल्यांदाच नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई 

परशुराम कोकणे

सोलापूर : पशु-पक्ष्यांसह मानवाला धोकदायक ठरलेल्या पतंगाच्या नायलॉन आणि काचेरी मांजाच्या विक्रीबाबत "सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी धोकदायक मांजाच्या समस्याकडे गांभीर्याने पाहिल्याने गुन्हे शाखेच्या पथकाकडून सोलापुरात पहिल्यांदाच मांजा विक्रेत्यांवर कारवाईला सुरवात झाली आहे. 

मेहमूद रसूल सय्यद (रा. सिद्धेश्वर पेठ, नगरसेवक हत्तुरे यांच्या घराजवळ, सोलापूर) हा इंडियन पतंग मार्ट येथे 2800 रुपयांचा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असताना मिळून आला. सरफराज अ.कदिर देवणी (रा. लोकमान्य नगर, नईजिंदगी जवळ, सोलापूर) हा हनिफ पतंग मार्ट येथे 2700 रुपयांचा बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करताना सापडला. चौपाड येथील आकाश स्नॅक्‍स दुकानात नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या छाया गणपत साबळे यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1100 रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. 

ही कारवाई पोलिस आयुक्त महादेव तांबडे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव, पोलीस नाईक संतोष पापडे, दीपक राऊत, संजय पवार, शांताराम वाघमारे, आप्पा पवार यांनी केली आहे. 

मांजा विक्रेते सय्यद, देवणी आणि साबळे त्यांच्या विरुद्ध जेलरोड व फौजदार चावडी पोलिस ठाण्यात पर्यावरण (संरक्षण कायदा) 1986 चे कलम 5 सह भारतीय दंड संहिता 188, 290 आणि 291 प्रमाणे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण 6 हजार सहाशे रुपयांचा प्रतिबंधीत नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. 

मनुष्य, प्राणी, पक्षी यांच्यासाठी धोकादायक, उपद्रवी ठरलेला आणि न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी असलेला नायलॉन नॉनलॉन आणि काचेरी मांजाची विक्री किंवा साठा करता येवू शकत नाही. यापुढेही मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरु राहणार आहे. सोलापुरात कोठेही मांजा विक्री होत असेल तर 9822022848 या मोबाईल क्रमांकावर माहिती द्यावी. 
- भीमसेन जाधव, 
पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT