Action taken against seven black market shops 
पश्चिम महाराष्ट्र

काळाबाजार करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा

नगर ः लॉकडाऊनच्या काळात काळाबाजार करणाऱ्या सात दुकानांवर कारवाई करण्यात आली. यातील चार दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांवर दंडात्मक कारवाई, तर एका दुकानदाराचा परवाना निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहे. ""जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. साठेबाजी, अनियमितता, काळाबाजार आढळल्यास महाराष्ट्र जीवनाश्‍यक वस्तू अधिनियम कलम 3 व 7 अन्वये कारवाई केली जाईल, काळाबाजार, साठेबाजी, गैरप्रकराला थारा दिला जाणार नाही,'' असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला. 

मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. जिल्ह्यातील एक हजार 884 स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य वितरण सुरळीत व्हावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभाग सतर्क आहे. दरम्यान, मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजाराची चाहूल लागली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे. महसूल, आरोग्य व पोलिस यंत्रणा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम करीत आहे. 

जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यातील प्राधान्यक्रम, अत्योंदयसोबतच केसरी शिधापत्रिकाधारकांनादेखील एप्रिल मंजूर नियतन व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत तांदळाचे वितरण सुरू आहे. एप्रिल महिन्यात 95 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त धान्याचे वितरण करण्यात आले. स्वस्त धान्य वितरणच्या प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहायक पुरवठा अधिकारी सुनील सौंदाणे, अन्न धान्य वितरण अधिकारी प्रदीप पवार, अन्न धान्य निरीक्षण अधिकारी विजय उमाप, अभिजित वांढेकर आदी कार्यरत आहे.

दुकानदारांचे दणाणले धाबे

वितरण प्रक्रियेतील लाभार्थ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षही कार्यान्वित केला आहे. धान्य वितरण प्रक्रिया व गैरप्रकारावर पुरवठा विभागाचा वॉच आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा सुरू झाला. यात सात दुकानदारांनी अनियमितता, काळाबाजार केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. 

तालुकानिहाय कारवाई 
कैलास बोरावके (कोपरगाव) 
कानिफ आंधळे (पाथर्डी) 
वैशाली कांबळे, शिल्पा पटेकर (नगर) 
शिवनाथ भागवत व पंडित दीनदयाळ सोसायटी (संगमनेर) 
श्रीसंत भगवानबाबा महिला बचत गट (जामखेड) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: तापमान आणखी वाढणार; घाटमाथ्‍यावर आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता,कसे असेल हवामान? जाणून घ्या

Swachh Survekshan:आनंदाची बातमी! 'स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत' कऱ्हाड देशात अव्वल; दिल्लीत हाेणार गौरव, सलग सहाव्यांदा पुरस्कार पटकावला

Pune News: वाकडमध्ये फ्लॅटसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम

मोठी बातमी! आता विद्यार्थी अन् प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक; वर्गातच असणार बायोमेट्रिकची मशिन; परीक्षेसाठी ७५ टक्के उपस्थिती आवश्यक

Beet Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

SCROLL FOR NEXT