sangli  sakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीचा बेदाणा खातोय भाव ; सणासुदीच्या तोंडावर बंपर दरवाढ

अफगाण परिस्थितीने बेदाणा उद्योगात ‘फील गुड’

अजित कुलकर्णी

सांगली : अफगाणिस्तान देशातील परिस्थितीमुळे जिल्ह्याचे ‘कॅश क्रॉप’ असणाऱ्या बेदाणा उद्योगात ‘फील गुड’ निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्यापासून बेदाणा दरात प्रति किलो तब्बल पंचवीस रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. सध्या जिल्ह्यात शिल्लक असणाऱ्या सुमारे ६५ हजार टन मालाची दराच्या बाबतीत चांदी होणार आहे.

अफगाणिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे भारतात इतर देशातून बेदाणा आयात होतो. मात्र तालिबान्यांनी अफगानिस्तानवर कब्जा करताच अंदाधुंद परिस्थिती निर्माण झाली. अफगाणिस्तान-पाकिस्तानमार्गे दळणवळणाची सर्व साधने बंद झाली. अनेक ठिकाणी असणारे चेक पोस्ट उध्वस्त करण्यात आल्याने आयात होणारा माल पूर्णपणे बंद झाला आहे.

भारतातील कोरोना परिस्थितीत सुधारणा होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले गेले आहेत. सध्या सणांचा हंगाम सुरू झाला असून देशांतर्गत थंडावलेले दळणवळणही वेग घेत आहे. दिल्लीत दाखल होणारा बेदाणा देशभर जातो. त्याचा स्टॉक मर्यादित असल्याने नजीकच्या काळात सांगली जिल्ह्यातून देशभर जाणारा बेदाणा भलताच भाव खात आहे.

गेल्या आठवड्यात तासगावमध्ये झालेल्या सौद्यादरम्यान दरात लक्षणीय उसळी घेतली आहे. प्रतिकिलो २०० ते २२५ च्या दरम्यान असणारा दर आज २७५ रुपयाच्या जवळपास आहे. त्यामुळे मालाचा उठावही चांगला होत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा-दिवाळी हे सण समोर ठेवून होणारी उलाढाल यंदा बंपर असेल. जिल्ह्यातील सुमारे ८० शीतगृहात सव्वा दोन लाख टन बेदाणा साठवणूक होते. त्यापैकी अजूनही ५० टक्के माल शिल्लक आहे. सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर दरात तेजी सुरू झाल्याने शेतकरी माल विक्री करत आहेत.

तासगाव, सांगली कायमच ‘बेस्ट’

दिल्लीतील व्यापारी अफगाणिस्तान व इतर देशातून येणाऱ्या बेदाण्याची देशभर विक्री करतात. मात्र प्रतवारीत सांगली, नाशिक, विजापूर भागातील बेदाणा आजवर सर्वोत्तम ठरला आहे. अफगाण देशातील माल प्रामुख्याने चॉकलेटी तसेच गोड असतो. तरीही तासगाव, सांगली मार्केटमधील बेदाणा रंग, वजन, चवीच्या बाबतीत कायमच सरस असल्याने दरात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

अफगाणमधील परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसत आहे.

अफगाणमधील परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसत आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे मार्केटिंगच्या मालाचा बेदाणा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यांना या दरवाढीमुळे चांगला फायदा होईल. दरात अजूनही घसघशीत वाढ होण्याची अपेक्षा आहे. सणासुदीच्या तोंडावर माल विक्रीस आणल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल.

-सुशील हडदरे, बेदाणा व्यापारी, सांगली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT