BLOOD DONATE.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

विवाहानंतर त्याने साधला रक्तदानाचा मुहूर्त...जागतिक रक्तदानदिनी बोहल्यावरच केले रक्तदान 

विजय लोहार

नेर्ले (सांगली)- आयुष्याची नवी सुरुवात करताना आपल्या पत्नीला साक्षी मानत त्याने बोहल्यावर लग्नाच्याच दिवशी रक्तदान करून सामाजिक जाणिव जोपासली. "कोरोना'च्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने कराड तालुक्‍यातील सदाशिवगड येथील एका खासगी बॅंकेत काम करणाऱ्या कॅशियरने हा आदर्श घालून दिला. 

वाळवा तालुक्‍यातील तांबवे येथील युवतीशी त्याचा विवाह झाला. इस्लामपूर येथील देव सेलिब्रेशन हॉलमध्ये लग्न सोहळा रंगला. लग्नाची गाठ बांधली गेल्यानंतर तिच्या साक्षीने त्याने बोहल्यावरच रक्तदान केले. जन्मोजन्मी हाच नवरा म्हणणाऱ्या पत्नीचा आनंद द्विगुणित झाला. आज जागतिक रक्तदान दिन आणि "कोरोना' च्या काळात रक्तदानासाठी होत असलेले आवाहन याचा विचार करून सदाशिवगड (ता. कराड) येथील स्वप्निल डुबल या वराने हा निर्णय घेतला. तांबवे येथील ऐश्वर्या राजेंद्र पाटील हिच्याशी लग्न जमले. लग्नाचा मुहूर्त आजचा होता. पै-पाहुणे गोळा होवून "सोशल डिस्टन्स' पाळत इस्लामपूर येथील देव सेलिब्रेशन हॉल मध्ये अक्षता पडल्या. लग्न झाल्यानंतर नवरदेव स्वप्नील यांने राजारामबापू रक्तपेढीच्या मदतीने बोहल्यावरच रक्तदान केले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदानाचे आवाहन केले जात आहे. आज रक्तदान दिन आणि विवाह असा योग जुळून आला होता. तेव्हा या आनंदाच्या क्षणी सामाजिक जाणीवेतून रक्तदान करून दोन्ही मुहूर्त साधून स्वप्नीलने संसाराची सुरुवात केल्याबद्दल पत्नी ऐश्वर्या हिला देखील अभिमान वाटला. स्वप्निल हा इलेक्‍ट्रिकल इंजिनीअर असून तो कराड येथील एका बॅंकेत कॅशीयर म्हणून नोकरी करतो. तर पत्नी ऐश्वर्या ही एम.एस्सी झाली आहे. दोघेही उच्चविद्याविभूषित आहेत. कोरोनामुळे साधेपणाने लग्न करून काहीतरी सामाजिक कार्य करता आल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे स्वप्नील याने सांगितले. कराड येथील वसंत डुबल, बाळासाहेब डुबल, दिलीप डुबल, डॉ. सुधीर डुबल, तांबवेचे राजेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, संपतराव पाटील, विलास पाटील, उदय पाटील, विजय मोरे आदी मंडळींनी नववधूवरांचे कौतुक केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

SCROLL FOR NEXT