पश्चिम महाराष्ट्र

वीज दरवाढप्रश्नी नऊ ऑगस्टला महामार्ग रोकोचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कृषी पंपाच्या रखडलेल्या जोडण्या त्वरीत दयाव्यात यासह कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे  ही दरवाढ कमी करावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, इरिगेशन फेडरेडशनसह अन्य संघटनांनी सोमवारी (ता.1) महावितरण कार्यालयावर धडक मारली.

माजी खासदार राजू शेट्टी, ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, आमदार सतेज पाटील, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मागण्या मान्य न झाल्यास नऊ ऑगस्टला पुणे बंगळूर महामार्ग रोखण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. 

मागण्या मान्य होत नसल्याने आता तीव्र आंदोलन उभारण्यात येणार आहे. प्रसंगी मंत्रालयाला घेराओ घालू, आता निर्धार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाची धार येथून पुढे वाढविण्यत येईल. शासनाने कोणतीही आश्‍वासने पाळली नाहीत हे संतापजनक आहे. 

- प्रा. एन. डी. पाटील

श्री शेट्टी यांनी महावितरण कंपनीच्या धोरणावर जोरदार हल्ला चढविला. महावितरणने न वापरलेल्या वीजेचे बील शेतकऱ्यावर लादलेले आहे. शेतकऱ्याने वीज वापरली असे सांगून महावितरण कंपनी आपला भ्रष्टाचार लपवू पहात आहे. महावितरण कंपनीने कृषी-औद्योगिक घरगुती वाणिज्य ग्राहकांच्या विजेच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे ही दरवाढ कमी करण्याचे आश्वासन भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते पण सतेवर आल्यापासून राज्यातील कृषीपंप धारक, घरगुती, औद्योगिक ग्राहकांची बेसुमारपणे आर्थिक लूट या सरकारच्या काळात सुरु आहे. वीजनिर्मिती खर्च, प्रशासकीय खर्च आणि वीज गळती यावर कोणतेही नियंत्रण नाही. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी दिलेल्या आश्वासनांची अजूनही पूर्तता झालेली नाही. राज्यातील सर्व लाख शेतीपंप धारक वीज ग्राहकांचे वीज बिले तपासून दुरुस्त व अचूक करण्यात यावी. यासाठी आता लढा तीव्र करण्यात येइल. 

दसरा चौकातून दुपारी दीड वाजता मोर्चाला सुरवात झाली. महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा महावितरणच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT