sangali
sangali 
पश्चिम महाराष्ट्र

#MarathaKrantiMorcha मराठा क्रांती मोर्चाचे सांगलीत पाण्यात ठिय्या आंदोलन

सकाळवृत्तसेवा

सांगली : राज्यभर मराठा क्रांती आंदोलनाचा भडका उडाला असून आज सांगली कृष्णाकाठी मराठा क्रांतीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पाण्यात उड्या घेत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात, अनेक होड्या, लाईफ जॅकेटसह आपत्ती निवारणाची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. पाण्यात उभे राहून कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवायची, अशी शपथ घेतली. 

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून आंदोलन पेटलेले असताना सांगली, मिरज, कुपवाड शहरात महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे क्रांती मोर्चानेच शांततेचे आवाहन केले होते. तथापी, कायगाव येथील काकासाहेब शिंदे यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले असून त्याचे पडसाद सांगलीतही उमलटले. कालपासून जिल्हाभर आंदोलन तीव्र करण्यात आले. 

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज पाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा दक्ष होती. सकाळपासूनच कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह दोन उपाधीक्षक, शहरातील सर्व निरीक्षक यांच्यासह सुमारे चारशे पोलिस बंदोबस्तात तैनात होते. 

दहा वाजता क्रांती मोर्चाच्या क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नदीकडे कूच केली. आंदोलन शांततेत करू, अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यामुळे ठराविक कार्यकर्त्यांना नदीत प्रवेश देण्यात आला. त्यात डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, महेश खराडे, नितीन चव्हाण आदी कार्यकर्ते कमरेएवढ्या पाण्यात उतरले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचा लढा अखेरच्या श्‍वासापर्यंत सुरु ठेवण्याची शपथ घेतली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT