Ahmednagar finally got a new municipal commissioner
Ahmednagar finally got a new municipal commissioner 
पश्चिम महाराष्ट्र

अखेर नगरला मिळाले नवे महापालिका आयुक्‍त 

सकाळ वृत्तसेवा


नगर ः सोलापूर महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त तथा वाहतूक विभागाचे प्रमुख श्रीकांत मायकलवार यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांची नगर महापालिकेच्या आयुक्‍तपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली. या संदर्भातील आदेश काल (ता. 13) सायंकाळी नगरविकास विभागाने काढला. 
मायकलवार हे 4 सप्टेंबर 2014 रोजी सोलापूर महापालिकेत उपायुक्‍त म्हणून रूजू झाले होते. त्यानंतर एक जुलै 2017ला शासनाने त्यांची अतिरिक्‍त आयुक्‍तपदी नियुक्‍ती केली होती. मायकलवार सोलापूर महापालिकेत जाण्यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते लवकरच नगर महापालिकेचा पदभार घेणार आहेत. 

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीला तत्कालीन महापालिका आयुक्‍त श्रीकृष्ण भालसिंग निवृत्त झाल्यावर हे पद रिक्‍त झाले. गेली सुमारे साडेतीन महिने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नगर महापालिका आयुक्‍तपदाचे प्रभारी काम पाहिले. नगर महापालिकेला स्वतंत्र आयुक्‍त मिळावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी नगर विकास विभागाकडे केली होती. तसेच शिवसेना व इतर पक्षांनीही मंत्रालयात मागणी केली होती.

पुणे येथील बससेवेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी अजय चारठणकर यांच्यासाठी आमदार संग्राम जगताप आग्रही होते तर शिवसेना अकोला महापालिकेतील उपायुक्‍त अर्चना गगे यांच्यासाठी प्रयत्नशील होती. मात्र नगरविकास खात्याकडून मायकलवार यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

सोलापूर महापालिकेत उपायुक्‍त व नंतर अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून काम पाहिलेले मायकलवार पहिल्यांदाच सोलापूर शहर सोडून बाहेरच्या महापालिकेत सेवा करणार आहेत. त्यामुळे त्यांना नगर शहर व त्यातील गुंतागुंतीचे राजकारण, समाजकारणासह कारभार पद्धती समजून घेण्यासाठी वेळ लागणार आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT