pollution
pollution 
पश्चिम महाराष्ट्र

हवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : हवा प्रदूषणामध्ये "स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे महापालिकेतील सूत्रांनी "सकाळ'ला सांगितले. 

प्रदूषणाची सर्वोच्च पातळी गाठूनही त्यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेल्या देशातील 102 शहरांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उपाययोजना करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 17 शहरांचा समावेश आहे. ही यादी केंद्रीय मंडळाने चार महिन्यांपूर्वीच जाहीर केली होती आणि कृती आराखडा सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार सोलापूर महापालिकेने कृती आराखडा पाठविला आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहराच्या अगोदर मुंबई, नवी मुंबई, बदलापूर, उल्हासनगर, पुणे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली या शहरांचा, तर सोलापूर शहरानंतर जालना, नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर व लातूर या शहरांचा क्रमांक असल्याचे दिसून येते. धूलिकणामुळे शहरात हवेचे प्रदूषण जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यावर आता महापालिका काय उपाययोजना करते, त्यावर प्रदूषणाची पातळी निश्‍चित होणार आहे. 

प्रदूषणवाढीस हे प्रकारही आहेत कारणीभूत 
वाहतूक पोलिस.... 
- हेल्मेटसाठी दंड वसुली पण स्क्रॅप वाहनांकडे दुर्लक्ष 
- शांतता क्षेत्रातील निश्‍चित वाहन क्षेत्राची सोय नाही 
- प्रदूषित चौकातील हवा प्रदूषण नियंत्रणाचा उपाय नाही 

महापालिका... 
- ज्वलनशील कचरा जाळण्यावर कारवाई नाही 
- प्लास्टिक कचऱ्यातील प्रदूषणाकडे सर्रास दुर्लक्ष 
- सायकलिंग ट्रॅकसारख्या उपाययोजना दुर्लक्षित 
- सार्वजनिक परिवहन व्यवस्थेच्या प्रदूषण दुर्लक्षित 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू; मल्लिकार्जुन खर्गेंनी बजावला मतदानाचा हक्क

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी कारवाई, शूटर्सचा सर्वात मोठ्या मदतनीसाला राजस्थानमधून अटक

SCROLL FOR NEXT