pulwama
pulwama 
पश्चिम महाराष्ट्र

अपशिंगेत वातावरण सुन्न, काळजी अन् संतापही

सुनील शेडगे

नागठाणे - देशाला आजवर हजारों सैनिक देणाऱ्या अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) गावात काश्मीरमधील घटनेनंतर आज वातावरण सुन्न होते. 

अपशिंगे म्हणजे सैनिकांचे गाव. आजही येथील युवापिढीचा सैनिकी परंपरेकडे असलेला ओढा कायम आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने गावातील युवक सैन्यात भरती होतात. त्यातील बहुतेक सेवेच्या पहिल्या टप्प्यात सीमेवर कार्यरत असतात. सध्याही येथील सैनिक सीमेवर असणाऱ्या वेगवेगळ्या युनिटमध्ये सहभागी आहेत. 'सीआरपीएफ'मध्ये कार्यरत असलेल्या गावातील सैनिकांची संख्या चाळीसच्या घरात आहे. काश्मीरमधील घटनेनंतर गावात सुन्न वातावरण होते. सैनिकांच्या कुटुंबियातही अस्वस्थता होती. संपर्क साधण्याच्या दृष्टीने फोन सुरु होते. या घटनेनंतर संतापही व्यक्त होत होता.

जम्मू काश्मीरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. अशा घटना सातत्याने घडताना दिसतात. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची वेळ येऊन ठेपली आहे. कोणताही राजकीय मुद्दा न करता अतिरेक्यांचा कायमचा बीमोड होण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत निकम यांनी व्यक्त केली. 

अपशिंगेत आज बंद
दरम्यान, आज येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहिली. उद्या (शनिवारी) गावातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT