पश्चिम महाराष्ट्र

खासदार, आमदारांसह दिग्गजांचे अर्ज

सकाळ वृत्तसेवा

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी दिग्गजांसह तब्बल २०४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आज अर्ज दाखल करणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये खासदार संजय पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक यांचा समावेश आहे. तसेच माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, जयश्री मदन पाटील, अनिता सगरे, बाजार समिती सभापती दिनकर पाटील यांनीही आज अर्ज दाखल केले. आतापर्यंत २५३ अर्ज दाखल झाले आहेत. आजअखेर ७६९ अर्जांची विक्री झाली असून शुक्रवारी (ता.२२) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होतील.

बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक लागली आहे. सध्या अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज चौथ्या दिवशी जिल्ह्यातील २०४ जणांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी (ता.२५) अर्ज छाननी होणार असून माघारीसाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आज चौथ्या दिवशी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये विद्यमान संचालक सी. बी. पाटील, सुरेश पाटील, चंद्रकांत हाक्के, सिकंदर जमादार, बँकेचे माजी अध्यक्ष डी. के. पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, किरण लाड, चिमण डांगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, बँकेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत देठे, ॲड. बाबासाहेब मुळीक, रवींद्र बर्डे, माजी महापौर संगीता खोत, राहुल महाडिक, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, सत्यजित नाईक, तम्मणगौडा रवी-पाटील, तानाजी यमगर, सुरेश शिंदे, प्रकाश जमदाडे, मीनाक्षी अक्की, मालन मोहिते, सी. आर. सांगलीकर, चन्नाप्पा होर्तीकर, बजरंग पाटील, रमेश भाकरे आदिंचा समावेश आहे. अर्ज दाखल करणारे राष्ट्रवादी, कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेना आदी पक्षांतील आहेत.

बँकेतील विद्यमान संचालकांसह उर्वरित दिग्गज आणि इच्छुक मंडळी शुक्रवारी देखील मोठ्या संख्येने अर्ज दाखल करतील असे चित्र आहे. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार असल्यामुळे छाननीनंतर नेतेमंडळींना अर्ज माघारीसाठी कसरत करावी लागणार आहे.

आजअखेर दाखल झालेले अर्ज

गट एकूण

  1. विकास संस्था गट ‘अ’ ६८

  2. महिला प्रतिनिधी २७

  3. अनुसूचित जाती-जमात १६

  4. इतर मागास प्रवर्ग १९

  5. वि.जा.,भ.ज. व वि.मा १८

  6. शेती संस्था १९

  7. कृषी पणन प्रक्रिया ०८

  8. नागरी बँका, पतसंस्था ३८

  9. इतर संस्था ४०

  10. व्यक्ती सभासद

एकूण २५३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT