पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर शहराची विकास योजना सुधारित करण्यास मंजुरी

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - कोल्हापूर शहराची विकास योजना तिसऱ्यांदा सुधारित करण्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी २३ पदांना मंजुरी दिली आहे. लवकरच विकास योजनेचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. नांदेड, नागपूरबरोबरच कोल्हापूरच्याही विकास योजनेला शासनाने मंजुरी दिली आहे. 

कोल्हापूर शहर विकास योजना तिसऱ्यांचा सुधारित करण्यासाठी शासनाकडून पायाभूत नकाशा (बेस मॅप) व विद्यमान भू-वापर नकाशा (ईएलयू) तसेच प्रस्तावित भू-वापर नकाशा (पीएलयू) तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.

नव्या आराखड्यात..

  •   विकासाच्या नव्या वाटा कोणत्या?
  •   शहर विकास कसा होऊ शकतो
  •   भविष्यात शहराची गरज काय
  •   हॉस्पिटल, मैदाने, बगिचे यांसह अन्य आरक्षणे, रिंगरोड यासह इतर माहिती
  •  वाढणारी वाहने, पार्किंग, वाहतूक व्यवस्था

त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेली नांदेड आणि कोल्हापूर येथील प्रादेशिक योजना कार्यालये यांचे नामाभिधान बदलून अनुक्रमे उपसंचालक नगररचना, विकास योजना, विशेष घटक, कोल्हापूर महानगरपालिका पदांसह स्थानांतरीत व स्थलांतरित करण्यास मान्यता दिली. याबाबतचा निर्णय २७ मे २०१९ रोजी मंत्रालयात झाला.

२३ पदे अशी
उपसंचालक एक, सहाय्यक संचालक एक, नगररचनाकार एक, सहाय्यक नगररचनाकार तीन यांच्यासह स्वीयसहाय्यक, संशोधन सहाय्यक, प्रमुख आरेखक, सहाय्यक आरेखक, कनिष्ठ आरेखक, अधीक्षक, प्रथम लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक, नील मुद्रक, दप्तरबंद, शिपाई अशी एकूण तेवीस पदे मंजूर आहेत. 

नागपूर शहराची विकास योजना दुसऱ्यांदा सुधारित करण्यासाठी व कोल्हापूर शहराची विकास योजना तिसऱ्यांदा करण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामध्ये पहिले पाऊल म्हणून स्वतंत्र कार्यालय आणि यासाठी आवश्‍यक पदांची नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे आदेश झाले आहेत. या आदेशानुसार आता स्वतंत्र कार्यालयातून शहराची विकास योजना तयार केली जाणार आहे. प्रत्येक वीस वर्षांनंतर हा विकास आराखडा तयार होणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात काही वर्षांत हा विकास आराखडाच तयार झाला नाही. परिणामी त्याचा मनःस्ताप सध्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. भविष्यातील शहराचा विकास कसा असावा, त्यासाठी नियोजन काय असावे, रस्ते आरक्षण या संदर्भातील सर्व माहिती या आराखड्यात असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

SCROLL FOR NEXT