shivrajyabhishek ceremony  
पश्चिम महाराष्ट्र

Shivrajyabhishk : ७२ तासात सव्वा लाख स्क्वेअर फुटांवर साकारला शिवराज्यभिषेक सोहळा! शंभर कलाकारांनी साकारली महारांगोळी

इंडिया बुक, अमेझिंग इंडिया बुक, वर्ल्ड वाईड बुक, युनिक वर्ल्ड, एशिया बुक, लिम्का तसेच बेंगॉल बुक या आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रमांची नोंद करणाऱ्या संस्थांनी रांगोळीची पाहणी केली आहे.

धर्मवीर पाटील,

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : सांगली जिल्ह्यातील कलाकारांनी रायगड जिल्ह्यात भुवनेश्वर येथे विश्वविक्रमी 'महारांगोळी' रेखाटली आहे. १०० कलाकारांच्या सहभागातून ७२ तासात १ लाख २६ हजार स्क्वेअर फूट आकारात ही विश्वविक्रमी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. 'शिवराज्याभिषेक' प्रसंगावर आधारित या रांगोळीकडे अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांचे लक्ष्य वेधले आहे. येत्या सात जूनला या विक्रमी नोंदीची घोषणा होणार आहे. रांगोळी रायगड जिल्ह्यात साकारली असली तरी सांगली जिल्ह्यातील कलाकारांनी सांगलीचा डंका तिकडे वाजवून कलेला कोणत्याही सीमारेषा नसतात, असे दाखवून दिले आहे.

सांगली जिल्ह्यातील शंभर कलाकारांचा यामध्ये सहभाग आहे. या 'महारांगोळी'चे प्रकल्प संचालक राजीव पाटील तसेच राजारामबापू पाटील चित्रकला महाविद्यालयातील प्राचार्य प्रदीप पाटील यांच्या संकल्पनेतून अनिल शिंदे, संतोष ढेरे, यांच्या पुढाकाराने व अर्जुन बिराजदार, सागर जाधव, विनायक गायकवाड, प्रताप जोशी आदींच्या समन्वयातून २ ते ७ मार्चच्या दरम्यान हा विश्वविक्रमी प्रकल्प साकारला आहे.

इंडिया बुक, अमेझिंग इंडिया बुक, वर्ल्ड वाईड बुक, युनिक वर्ल्ड, एशिया बुक, लिम्का तसेच बेंगॉल बुक या आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रमांची नोंद करणाऱ्या संस्थांनी रांगोळीची पाहणी केली आहे. पैकी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, आसाम बुक आणि महाराष्ट्र बुक यांच्याकडून पुरस्कारासाठी या प्रकल्पाची नोंदणी करण्यात आली आहे. राजीव पाटील यांनी या रांगोळीसाठी 'ऑल इज वेल' या पथकाच्या माध्यमातून मेहनत घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसने याची दखल घेतली. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व अदिती तटकरे यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला सहकार्य मिळाले.

Artists from Sangli district created rangoli shivrajyabhishek ceremony in Raigad Bhuwaneshwar marathi News
Artists from Sangli district created rangoli shivrajyabhishek ceremony in Raigad Bhuwaneshwar marathi News

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाली. याचे औचित्य साधून राज्य शासनाने वर्षभर विविध उपक्रम घेतले. १ लाख २६ हजार चौरस फूट शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तैल चित्राची रांगोळी साकारणे ही सोपी गोष्ट नव्हती. हे आव्हान सांगली जिल्ह्यातील कलाकारांनी पेलले. नैसर्गिक आपत्ती व परिस्थितीशी झुंज देत या कलाकारांनी जागतिक पातळीवरील विक्रमी नोंद केली आहे. ऑल इज वेल पथकाने रांगोळी साकारताना घेतलेल्या मेहनतीची दखल आज घेतली जात आहे. यामध्ये सांगलीतील वृषाली अवसरे, कृष्णात सुतार, अशोक बाबर, सुरेश छत्रे, आदर्श फार्णे, अभिजीत सूर्यवंशी, चेतन कुंभार, दीपक सुतार, कृष्णा नाथगोसावी, नितीन मोरे, राजेंद्र शिंदे, गणेश वेदपाठक, किरण शिंदे, तृप्ती कदम, खुशबू मुल्ला, सौरभ कांबळे यांच्यासह अन्य कलाकारांचा सहभाग होता. या प्रकल्पासाठी एकूण ३५ टन रांगोळीचा वापर करण्यात आला.

Artists from Sangli district created rangoli shivrajyabhishek ceremony in Raigad Bhuwaneshwar marathi News

"सांगलीमध्ये २०१९ साली एका स्टेडियमवर १ लाख ६ हजार स्क्वेअर फुट रांगोळी रेखाटण्यात आली होती. तेव्हापासून याच्यापेक्षा मोठ्या आकारात रांगोळी रेखाटण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानंतर २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे ध्येय पूर्ण करता आले, याचे समाधान आहे. ७२ तासात एक लाख २६ हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी रेखाटताना अनेक आपत्तींशी सामना करावा लागला. झुंज द्यावी लागली. छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि या अस्मितेला विश्वविक्रमी स्वरूप देण्याचे ध्येय ठेवले होते, ते सुनील तटकरे, अनिकेत व आदिती तटकरे यांच्या माध्यमातून पार करता आले. सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेली संधी आजन्म लक्षात राहील अशी आहे."

-राजीव पाटील, प्रकल्प संचालक, महारांगोळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT