पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत - दुधवडकर

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर - राजू शेट्टी शेतकऱ्यांचे नेते नाहीत. त्यांनी फक्त राजकारण म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे पाहिले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला त्यांचा पराभव झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाची खऱ्या अर्थाने जाण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्नपूर्ती केली असून शेतकऱ्यांसह सर्वच प्रश्‍न शिवसेना सोडविण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केले. 

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. यानिमित्त शुक्रवारी (ता. ५) दुपारी दोन वाजता जयसिंगपूरमधील कल्पवृक्ष गार्डनमध्ये विजयी मेळाव्याचे आयोजन केले आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना-भाजपसह मित्रपक्षांचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पदधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

यानिमित्त आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणूक मतदारांनी आपल्या हातात घेतली होती. शेट्टींना लोकांनी ओळखूनच बाजूला केले. आपले कोण याची जाणीव आता शेतकऱ्यांना झाली आहे. आमदार उल्हास पाटील यांचेही प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.’’ 

आमदार उल्हास पाटील म्हणाले, ‘‘शिवसेनेने नेहमीच सर्व प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले आहेत. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आघाडी घेईल.’’ नगरसेवक पराग पाटील यांनी स्वागत केले. नगराध्यक्षा डॉ. सौ. नीता माने यांनी दुधवडकर यांचा सत्कार केला. 

तालुकाध्यक्ष सतीश मलमे यांनी आभार मानले. उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, शहराध्यक्ष स्वप्नील शहा, मंगलताई चव्हाण, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अर्चना भोजणे, संजय आणुसे, सूरज भोसले, अरुण लाटवडे, आण्णासाहेब बिलोरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT