Atpadi sanglis farmers pockets are getting empty because the fodder is expensive
Atpadi sanglis farmers pockets are getting empty because the fodder is expensive  
पश्चिम महाराष्ट्र

लढा दुष्काळाशी : चाऱ्याच्या पेंढ्यांनी शेतकऱ्यांचा खिसा केला रिकामा! (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) : आटपाडीचा आठवडे बाजारात 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली. या गावातील चाऱ्याच्या बाजारात काय अडचणी आहेत हे जाणून घेतले. 

ओला चारा तर जनावरांना उपलब्ध नाहीच पण सुका चाराही शेतकऱ्याचा खिशा रिकामा करणाराच ठरत आहे. या भागातील ऊसाचा हंगामही संपला आहे, त्यामुळे सुक्या चाऱ्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हा कडबा (चारा) सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूरातून आणतात. पण या सुक्या चाऱ्याचा शेकड्याला (शंभर पेंढ्या) दर अडीच हजार ते तीन हजार आहे. या भागात दुष्काळाची परिस्थिती असल्याने जनावरांना खायला शेतातील ओला चारा नाही, प्यायला विहीरीला पाणी नाही. त्यामुळे असा चारा खरेदी करावा लागत असल्याचे येथील शेतकरी सांगतात. शंभर पेंढ्या साधारण 20 दिवसात संपतात. असं उन्हाळ्यातील महिन्यात असाच खर्च करत राहावा लागतो आणि निसर्गाच्या पाण्याची वाट बघत बसावी लागत असल्याचीही व्यथा येथील शेतकऱ्यांनी मांडली. 

कडब्याची आवक आता कमी होत चालली आहे, कारण कडबाच आता संपत आला आहे, असे येथील बाजारातील चारा व्यापाऱ्यांनी सांगितले. कडबा संपत आल्यानंतर काय? असा प्रश्न व्यापाऱ्यांना विचारले असता, 'कुठे कडबा मिळालाच नाही, संपलाच तर कुठून आणणार.. आमच्याकडे विकायला काही राहत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांनाही खायला द्यायलाही काही राहत नाही...' अशी निराशा व्यक्त केली.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT