paschim maharashtra
paschim maharashtra Sakal
पश्चिम महाराष्ट्र

जागर स्त्री आरोग्याचा ! चर्चा करा चांगल्या-वाईट स्पर्शाची!

सकाळ वृत्तसेवा

भारतात सर्वसाधारपणे दहाव्या वर्षांनंतरच मुलींमध्ये तारुण्यावस्था येते. त्यानंतर साधारण एक ते दीड वर्षात मासिक पाळीला सुरवात होते. मुलींमध्ये काही वर्षांपूर्वी हा कालावधी आणखी कमी झाला होता. फास्ट फूड, जीवनशैलीतील बदल, इंटरनेट आणि माध्यमांची सहजता, हार्मोनयुक्त दूध, पोल्ट्री चिकन, व्यायामाचा अभाव, सकस आहाराचा अभाव अशी अनेक कारणे तेव्हा चर्चेत आली होती. आजही ही समस्या आहेच. मासिक पाळीबाबत कुटुंबात आधीपासूनच चर्चा होत नसल्याने अचानकपणे कमी वयात पाळी आल्यानंतर मुली घाबरतात; गोंधळतात. नैराश्‍य गाठते. तारुण्यावस्थेत होणाऱ्या बदलाचे मानसिक परिणामही जलद होतात. त्यासाठी आठ ते नऊ वयातच मासिक पाळीबाबत आई वडिलांनी मुलींना शिक्षित-सजग करण्यासाठी सुरवात केली पाहिजे. हे पटवून देताना ही एक नैसर्गिक बदलांची प्रक्रिया आहे. हे योग्य शब्दांत मांडता आले पाहिजे. आपले फॅमिली डॉक्टर्स, समुपदेशक किंवा यू ट्यूबसारख्या माध्यमांचा चांगला उपयोग होऊ शकेल. आपले मासिक पाळीचे अनुभवही आईने तिच्याशी शेअर करायला हवेत.

किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या तक्रारी खूप आहेत. पाळीतील अनियमितता, त्या काळात पोटदुखी, वेदना, रक्तस्त्राव कमी किंवा जास्त प्रमाणात होणे अशा तक्रारी असतात. रक्तातील हिमोग्लोबीन पातळी कमी झाली असेल तर लोहयुक्त सकस आहार आणि नियमित व्यायामाची गरज असते. वैद्यकीय सल्लाही घ्या. हार्मोन्स बदलामुळे चेहऱ्यावर पुरळ-मुरुम येणे नैसर्गिक आहे. अंगावरून थोड्या प्रमाणात पांढरे जाणे हे सुद्धा नैसर्गिक आहे. १० ते ४५ वयोगटांत आता कर्करोग प्रतिबंधक लशी दिल्या जातात. गर्भाशयाच्या ग्रीवेचा (cervical cancer) कर्करोगाची शक्यता त्यामुळे घटते. त्यासाठीही योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. सोळा वषनंर्षांर मुलींना धनुर्वाताची लस दिली पाहिजे. या वयोगटातच अभ्यासाचा ताण वाढत जातो. वर्षातून एकदा नेत्र तपासणीही करायला हवी.

आजकाल मुलींमध्ये आहाराबद्दल अनैक गैरसमजुती दिसतात. चित्रपट आणि अन्य माध्यमांचे ते विपरित परिणाम आहेत. स्लीम-ट्रीम दिसण्याचा अट्टाहास दिसतो. तारुण्यसुलभ बदल आणि त्याचवेळी आहारांबद्दलच्या चुकीच्या कल्पना यातून नैराश्‍य येण्याची शक्यता असते. शरीरासाठी आवश्‍यक सर्व अन्नघटक मिळणे गरजेचे असताना अशा काळात आहाराबद्दलच्या गैरसमजुतीचे परिणाम कुपोषणात होतात. पुढे विवाहानंतर प्रसूतीच्या काळात त्याचे दुष्परिणाम संभवतात. किशोरवयातील आहार हा खूप महत्त्‍वाचा असा भाग आहे. त्याचे आयुष्यभर चांगले-वाईट परिणाम भोगावे लागतात. आपल्या घरी आलेल्या कळीचे एका सुंदर फुलामध्ये रुपांतर व्हावे यासाठी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.

पालकांसाठी महत्त्‍वाचे

० मासिक पाळीबाबत आठव्या वर्षांपासूनच मुलीसोबत चर्चा करा.

० समाजमाध्यमांच्या बऱ्या-वाईट दुष्परिणामाबाबत सजग राहा.

० मुला-मुलींना चांगला-वाईट स्पर्शाबाबत बालवयातच सजग करा

० शारीरिक बदलांबाबतच्या शंका कुतूहलाचे वेळीच निरसन करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT