zp solapur 
पश्चिम महाराष्ट्र

"बी ई'च्या विद्यार्थ्याचा शिपाई पदासाठी अर्ज 

संतोष सिरसट

सोलापूर ः सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमातीची राखीव असलेल्या गट क व डी ची सरळसेवा भरती प्रक्रिया सध्या राबविली जात आहे. एकूण 16 जागांसाठी जवळपास चार हजार 400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये "बी ई'च्या विद्यार्थ्याने शिपाई पदासाठी अर्ज केल्याने सरकारी नोकरीसाठी उच्च शिक्षणही खुजे ठरत असल्याचा अनुभव येत आहे. 

सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक (40 टक्के), आरोग्य सेवक (50 टक्के), परिचर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ग्रामसेवकाच्या चार, आरोग्य सेविकेच्या पाच, आरोग्य सेवकाच्या पाच तर परिचर (शिपाई) पदाच्या दोन जागांसाठी हे अर्ज मागविले जात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारपर्यंतची (ता. 6) वेळ दिली होती. त्यानुसार जवळपास साडेचार हजारावर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी या भरती प्रक्रियेसाठी अहोरात्र काम करत आहेत. घरी जाण्यासाठी काही कर्मचाऱ्यांना रात्रीच्या एक-दोन वाजत आहेत. उशिरा घरी जाण्यापेक्षा काही जणांनी जिल्हा परिषदेत झोपणे पसंत केले आहे. 

सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकजण अट्टहास करत असल्याचे पाहायला मिळते. आपले शिक्षण किती उच्च दर्जाचे झाले आहे हे न पाहताही अनेकजण केवळ सरकारी नोकरीसाठी उच्च शिक्षण घेऊनही शिपाई पदासाठी अर्ज करतात हे या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने पाहायला मिळाले आहे. शिपाई पदासाठी "बी ई' बरोबरच एमए, बीए अशा पदवी घेतलेल्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. येत्या रविवारी (ता. 12) सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन या वेळेत लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. कंत्राटी ग्रामसेवकासाठी 200 गुणांची, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक या पदासाठीही 200 तर परिचर (शिपाई) पदासाठी 100 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमामध्ये निश्‍चित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जाचे प्रश्‍न या परीक्षेसाठी विचारले जाणार आहेत. परीक्षेची तयारी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने सुरू केली आहे. याशिवाय सेवक शिक्षक पदाची भरतीही केली जाणार आहे. मात्र, त्यांच्यासाठी लेखी परीक्षा होणार नाही. 

वेगवेगळ्या पदासाठी आलेले अर्ज 
आरोग्य सेवक (पुरुष 40 टक्के)-1700, आरोग्य सेवक (पुरुष 50 टक्के हंगामी फवारणी)-100, आरोग्य सेविका-500, कंत्राटी ग्रामसेवक-900, परिचर (शिपाई)-1200, एकूण-4400 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT