NCP
NCP 
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नगरसेवकासह बाबा खान दोन वर्षांकरिता स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक समद खान याच्यासह अंडा गँगचा प्रमुख बाबा खान याला संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये दोन वर्षांसाठी शहरातून स्थानबद्ध करण्यात आले. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी आज काढला. समद वहाब  खान (वय 47 रा. मुकुंदनगर ) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा प्रयत्न, विनयभंग, मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे विविध स्वरूपाचे  तीन गुन्हे दाखल होते.

शेहबाजउर्फ बाबा उर्फ बाबा अंडा जाफर खान ( वय 32, रा. मुकुंदनगर ) याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प, कोतवाली, तोफखाना या पोलिस ठाण्यांमध्ये सरकारी कामात अडथळा, दंगा करणे, धमकी देणे, मारहाण, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल होते. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे. या दोघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संघटित महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषय गुन्हेगार, विना परवाना शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे (एमपीडीए) या कायद्यान्वये दोन वर्षाकरिता स्थानबद्ध करावे असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडून मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी त्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पोलिस पथकाने वरील दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन स्थानबद्धतेची कारवाई केली.

मुकुंदनगरमध्ये होती दहशत
नगरसेवक समद खान आणि बाबा खान यांच्या दोन गटांमध्ये वारंवार मुकुंदनगरमध्ये टोळीयुद्ध सुरू होते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच निर्माण होत होता. सामान्य नागरिकांमध्ये ही या दोघांची मोठी दहशत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT