पश्चिम महाराष्ट्र

बाबासाहेबांच्या "येथील' परिषदेकडे होते जगाचे लक्ष 

विजयकुमार सोनवणे


सोलापूर ः सुमारे 92 वर्षांपूर्वी सोलापुरात झालेल्या महार वतन परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पृश्‍य व अस्पृश्‍य समाजाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. या परिषदेत ते काय बोलतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 

परिषदेला 92 वर्षे पूर्ण 
डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या सोलापूर भेटीला आज (मंगळवारी) 92 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 व 27 नोव्हेंबर 1927 रोजी सोलापुरात हे अधिवेशन भरले होते. या ऐतिहासिक परिषदेचा हा आढावा. बुधवार पेठेतील पंचाच्या चावडीमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. या परिषदेचे कार्यकारी सदस्य विश्‍वनाथ मेघाजी बनसोडे, मुकिंदा कुंडलिका बाबरे, निवृत्ती तुकाराम बनसोडे, रामा तुकाराम सरवदे, पापा सोमाजी तळभंडारे, विठ्ठल दरी सरवदे, तुकाराम अंदुबा बाबरे, बळी तुळजाराम तळमोहिते, भिकाजी गुरय्या तळभंडारे होते. जिवाप्पा ऐदाळे स्वागताध्यक्ष, उद्धव धोंडे शिवशरण चिटणीस, हरिभाऊ तोरणे खजिनदार म्हणून कार्यरत होते. नगराध्यक्ष माणिकचंद शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

साऱ्या जगाचे लागले होते लक्ष 
18 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याच्या परिषदेची पार्श्‍वभूमी या परिषदेला होती. स्पृश्‍य समाज आणि तत्कालीन वृत्तपत्रांनी अस्पृश्‍यांनी केलेल्या या सत्याग्रहावर टीकेची झोड उठवली होती. डॉ. आंबेडकर अस्पृश्‍यांना भलत्याच मार्गाकडे घेऊन जात आहेत. या प्रकारामुळे अस्पृश्‍यांना बहिष्काराला सामोरे जावे लागेल व कदाचित रक्तपातही होईल अशा वावड्या उठविण्यात आल्या. त्यामुळे बाबासाहेब सोलापुरातील परिषदेत काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या सर्व टिका आणि प्रतिवादाला बाबासाहेबांनी चोख प्रत्युत्तर या परिषदेत दिले, इतकेच नव्हे तर स्पृश्‍य व अस्पृश्‍य लोकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. या घटनेचे हजारो सोलापूरकर साक्षीदार ठरले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT