balgam crime case husband wife crime cases in belgaum wife death 
पश्चिम महाराष्ट्र

जीवनसाथीच ठरला वैरी ; दोरीने गळा आवळून गर्भवती पत्नीचा केला खून

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा पतीने दोरीने गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना रामदुर्ग तालुक्‍यातील तोरनगट्टीत बुधवारी (९) घडली. शैला रवी गर्लहोसूर (वय २८) असे मृत पत्नीचे नाव आहे. खुनानंतर पती रवी गर्लहोसूर (वय ३३) स्वत:हून पोलिसांना शरण गेला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, बागलकोट जिल्ह्यातील इळकलमधील इरम्मा जालीहाळ यांची मुलगी शैलाचा विवाह रवीसोबत सहा वर्षांपूर्वी झाला होता. या दाम्पत्याला मुलगा व मुलगी आहे. शैला तीन महिन्यांची गर्भवती होती. सुरवातीची काही वर्षे त्यांचा संसार आनंदात सुरू होता. त्यानंतर रवीने हुंड्यासाठी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ चालविला होता. तिने ही बाब आई, वडील व भावाला सांगितली होती. शैलाचा त्रास पाहून माहेरच्यांनी जावयाला यापूर्वी अनेक वेळा पैसे व सोन्याचे दागिने दिले होते. तरीही त्याने छळ सुरुच ठेवला. 

काही दिवसांपूर्वी शैलाच्या लहान भावाचे लग्न झाले. त्याला जास्त सोने दिले. मलाही तितकेच हवे आहे, असे म्हणत त्याने पत्नीला छळण्यास सुरु केले होते. मुलगी सुखी राहावी म्हणून आई-वडिलांनी पैसे देतो असे सांगून जावयाला काही दिवस थांबण्याची विनंती केली होती. तरीदेखील त्याने चार दिवसांपूर्वी पत्नीवर हल्ला केला. त्यानंतर त्याने पत्नीची समजूत काढली. बुधवारी पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्याच्या बहाण्याने तो तिला घेऊन घराबाहेर पडला.

काही अंतरावर गेल्यानंतर त्याने पत्नी शैलाचा जोंधळ्याच्या शेतात नेऊन दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर तो कटकोळ पोलिसात शरण गेला. चौघा मित्रांच्या मदतीने रवीने मुलीचा खून केला असून त्याने यापूर्वी अन्य एका महिलेशी विवाह केला आहे, असा आरोप शैलाच्या आई-वडिलांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी केवळ पतीविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. अन्य संशयितांविरोधातही गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कटकोळ पोलिस पुढील तपास करत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushila Karki: Gen-Z चा नायक सुशीला कार्कींसमोर नतमस्तक; कोण आहे सुदन गुरुंग?

आता CIBIL Score वाढवण्यासाठी ChatGPT मदत करणार, पण कशी? जाणून घ्या...

Asia Cup, IND vs PAK: 'आम्ही कोणत्याही संघाला...', भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या कर्णधाराने दिली वॉर्निंग

विकासासाठी शांतता हवी, मणिपूरमधील संघटनांना पंतप्रधान मोदींचं आवाहन; राज्यातील परिस्थितीवरही बोलले

Madhya Pradesh : मध्य प्रदेशमधील १.२६ कोटींहून अधिक लाडक्या बहिणींना मिळणार आर्थिक लाभ; मुख्यमंत्री यादव यांची घोषणा

SCROLL FOR NEXT