पश्चिम महाराष्ट्र

साताऱ्यात "पुढच्या वर्षी लवकर या...'चा जयघोष

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्‍या गणरायाला सातारकरांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. तब्बल साडेसोळा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर सुमारे 88 मंडळांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. 

गेले 11 दिवस अत्यंत उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची गुरुवारी (ता.12) सांगता झाली. विविध वाद्यांचा गजर, गुलालाची उधळण आणि अखंड सुरू असलेला गणरायाचा जयघोष अशा उत्साही वातावरणात मिरवणुकी काढण्यात आल्या. मुख्य विसर्जन मिरवणुकीस तांदूळ आळी येथे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते, प्रांताधिकारी आशा होळकर, नगराध्यक्षा माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, विविध विषय समित्यांचे सभापती तसेच नगरसेवक व नगरसेविका आदींच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. तसेच शनिवार पेठेतील श्री शंकर- पार्वती गणपतीच्या (मानाचा गणपती) विसर्जन मिरवणुकीस शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पालिकेच्या गणपती मंडळाच्या पाठोपाठ श्री शिवाजी उदय मंडळाने पारंपरिक पद्धतीने पालखीतून श्री गणेशाची मिरवणूक काढली.

या मिरवणुकीत मंडळाचे विविध खेळांतील राज्य, राष्ट्रीय खेळाडू फेटे घालून सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक मुख्य मार्गावर मार्गस्थ झाली. रात्री उशिरा विविध पेठांतून एकापाठोपाठ एकेक मंडळ मुख्य मिरवणूक मार्गावर येत होते. पावसाच्या सरीत कार्यकर्ते संगीताच्या तालावर, ढोल-ताशांच्या गजरात बेभान नाचत होते. बहुतांश मंडळांनी गणपतीच्या पाठीमागे विद्युत रोषणाई, फुलांची आकर्षक सजावट केली होती. चौकाचौकांत महिलांनीही फुगड्यांचा फेर धरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राजपथावर पालिका, भारतीय जनता पक्ष तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे स्वागत केले. 

बुधवार नाका येथील कृत्रिम तळ्यात सकाळपासून घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी नागरिक येत होते. मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती क्रेनच्या माध्यमातून विसर्जित करण्यात आल्या. आज सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी श्री शंकर-पार्वती गणपतीला मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सुमारे 650 पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. 

विसर्जन मिरवणुकीतील क्षणचित्रे... 
 ज्येष्ठ नागरिकांचा मंडळांच्या मिरवणुकीत सहभाग. 
 महिला व मुलींची झांजपथके ठरली लक्षवेधी. 
 पारंपरिक वेश आणि फेटेधारी युवकांची मोठी गर्दी. 
 आवाजांच्या फटाक्‍यांऐवजी रंगीबेरंगी कागदांच्या उधळण करणाऱ्या फटाक्‍यांना प्राधान्य. 
 ओसंडून वाहणाऱ्या उत्साहातही भान ठेवून कार्यकर्ते रुग्णवाहिकेला वाट करून देत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT