The basic price of sugar should be four thousand rupees 
पश्चिम महाराष्ट्र

साखरेची आधारभूत किंमत चार हजार रुपये द्यावी

प्रमोद जेरे

मिरज : केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत तीन हजार सातशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल द्यावी, अशी मागणी करणारा ठराव येथील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे (म्हैसाळकर) होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आदेशामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना शिंदे म्हणाले,""कारखान्याने आर्थिक झळ सोसून एफआरपीपेक्षा उसाला चांगला दर दिला आहे. साखर कारखान्याची वाटचाल सध्या प्रतिकूल परिस्थितीतही अत्यंत यशस्वीपणे सुरू आहे. ऊस उत्पादक सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच कारखाना विकासाचे टप्पे पार करतो आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिरज पूर्व भागासह जिल्ह्याच्या दुष्काळी भागास वरदान ठरलेली म्हैसाळ योजना सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेच्या पाण्याचा ऊस लागवड करून अधिकाधिक लाभ घ्यावा आणि पाणीपट्टी ही तातडीने सरकारजमा करावी.'' 

सभेच्या प्रारंभी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब कुरणे यांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक मोहनराव शिंदे आणि राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. यावेळी अहवाल वाचन संचालक विजयसिंह भोसले यांनी केले तर विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांनी केले. यावेळी सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषय हे सर्वानुमते मंजूर झाले. कारखान्याचे उपाध्यक्ष पर्स पाटील यांनी आभार मानले. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED seizes Anil Ambani assets : अनिल अंबानींविरुद्ध ‘ED’ची मोठी कारवाई! १ हजार ८८५ कोटींच्या मालमत्ता तात्पुरती जप्त

दिलीप सोपलांनी जागवल्या आठवणी! अजितदादांनीच केले मला मंत्री; चेष्टा करणारा मी एकमेव आमदार, एकदा मी झोपेत असताना सकाळी ६ वाजताच दादांचा कॉल आला अन्‌...

Ajit Pawar Death News LIVE Updates : पायलट सुमित कपूर दिल्लीचा रहिवासी होते

Pune University Exam : मोठी बातमी! पुणे विद्यापीठाच्या गुरुवारी होणारी हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलली

Phulambri News : 'अरे राजू, नुसतेच नारळ फोडतोय का?' – दादांचा तो सवाल, पाथ्रीच्या विकासाची दिशा ठरवणारा क्षण - राजेंद्र पाथ्रीकर

SCROLL FOR NEXT