Babasaheb Ambedkar Arch Dispute esakal
पश्चिम महाराष्ट्र

'ठराव करताना आम्हाला विश्‍वासातच घेतलं नाही'; डाॅ. आंबेडकर कमान पाडल्याप्रकरणी सात सदस्यांचा मोठा दावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांच्यासमोर सुनावणी झाली.

सकाळ डिजिटल टीम

या ठरावावेळी आम्हाला विश्‍वासात घेतले नसल्याचा दावा या सात सदस्यांच्या वकिलांनी केला.

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्या प्रकरणी (Dr. Babasaheb Ambedkar Welcome Arch Case) सरपंच, उपसरपंचांनी ठराव करताना विश्‍वासात घेतले नसल्याचा दावा सात सदस्यांच्या वकिलांनी केला आहे. तसेच प्रशासनाकडून सदस्यांवर ठेवण्यात आलेला ठपकाही चुकीचा असल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे.

बेडग (Bedag Gram Panchayat) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे (Trupti Dhodmise) यांच्यासमोर सुनावणी झाली. विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार ही सुनावणी सुरू आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सरपंच, उपसरपंच, सदस्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याबाबत जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांच्या अंतराने सुनावणी सुरू आहे.

यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते. बेडग स्वागत कमान पाडल्या प्रकरणी आजच्या सुनावणीवेळी सात सदस्यांच्या वतीने वकिलांनी युक्तिवाद करताना सरपंच, उपसरपंचांनी ठराव करताना विश्वासात घेतले नाही, असा दावा केला. नियमानुसार सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना सर्वाधिकार आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात सदस्यांची कोणतीही भूमिका येत नाही. सरपंचांनी मासिक बैठक बोलवल्यानंतर उपस्थित राहणे हे सदस्यांचे काम आहे. त्यानुसार आम्ही उपस्थित राहिलो होतो.

मात्र, या ठरावावेळी आम्हाला विश्‍वासात घेतले नसल्याचा दावा या सात सदस्यांच्या वकिलांनी केला. प्रशासनाकडून सदस्यांवर जो कारवाईचा ठपका ठेवला आहे, तोही चुकीचा आहे, असा दावाही यावेळी सदस्यांच्या वतीने वकिलांनी केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर यावर मत मांडण्यासाठी सरपंच गटाच्यावतीने वकिलांनी मुदत मागितली आहे. त्यानुसार ता. १३ फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे. यावेळी कैलास पाटील, विष्णू पाटील, गौतम नागरगोजे, सरपंच उमेश पाटील, मल्हारी नागरगोजे, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT