बेडकिहाळ : कार्तिक काटे श्री सिद्धेश्वर केसरीचा मानकरी
बेडकिहाळ : कार्तिक काटे श्री सिद्धेश्वर केसरीचा मानकरी  sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेडकिहाळ : कार्तिक काटे श्री सिद्धेश्वर केसरीचा मानकरी

गजानन पाटील

बेडकिहाळ : येथील ऐतिहासिक सिद्धेश्वर आंतरराज्य कुस्ती मैदानात कार्तिक काटे (दावणगेरी) याने प्रशांत शिंदे (सातारा) यास केवळ ७ मिनिटात दुहेरी पट्ट डावावर चितपट करून सिद्धेश्वर दसरा केसरी किताबाचा मानकरी ठरला. पहिल्या क्रमांकाची कुस्ती माजी आमदार काकासाहेब पाटील, दसरा कमिटी सदस्यांच्या हस्ते लावली. पंच म्हणून राजेंद्र शिंदे यांनी काम पाहिले. रविवारी (ता. १७) दुपारी ३.३० वाजता बेडकिहाळ ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर दसरा महोत्सव कमिटीतर्फे या आंतरराज्य कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शुभम सिदनाळे (दत्तवाड) व संतोष जगताप यांच्यात झाली. अटीतटीची ही लढत अखेरच्या क्षणी बरोबरीत सोडविली. पंच म्हणून राजू बचाटे यांनी काम पाहिले. कृषी पंडीत सुरेश देसाई, माजी ग्राम पंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांनी ही कुस्ती लावली.

मैदानाचे पूजन सोलापूरचे डॉ. विजय पाटील, गावकामगार संदीप पाटील, उद्योगपती प्रशांत पोलिस पाटील यांचे चिरंजीव प्रणव पाटील यांच्या हस्ते झाले. पहिली कुस्ती अरुण लवटे-गणू लवटे, आदिराज बुधगाव-सूरज पाटील यांच्यात झाली.

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती किरण भद्रावती व सचिन ठोंबरे यांच्यात झाली. त्यात किरणने घिसा डावावर सचिनला चितपट केले. पंच म्हणून वस्ताद परशुराम नंदिहळ्ळी यांनी काम पाहिले.

चौथ्या क्रमांकाची कुस्ती शिवा दड्डी (हुक्केरी) व अक्षय कदम (विठा) यांच्यात झाली. शिवाच्या कानाला इजा झाल्याने अक्षयला विजयी घोषित केले. पंच म्हणून शंकर बंडगर यांनी काम पाहिले. पाचव्या क्रमांकाची किर्तिकुमार बेनके व अमोल बागाव यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली.

कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील-बोरगाव, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, सिकंदर शेख, राजेंद्र शिंदे, डॉ. विलास जोशी, जवाहर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष हणमंत गुरव उपस्थित होते. यात्रेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पद्माकर पाटील, प्रमोदकुमार पाटील तर शिस्तबद्ध व्यवस्थापनाबद्दल हणमंत गुरव यांचा सत्कार झाला.

मैदानात शिवनेरी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या वतीने अनिल गौराई व विठ्ठल चिले यांच्यातील कुस्तीत चिले याने बाजी मारली. संस्थापक आर. जी. डोमणे, अध्यक्ष बाबुराव नारे यांच्या हस्ते चांदीची गदा देऊन सन्मानित केले. बेडकिहाळ पीकेपीएसचे अध्यक्ष पासगौडा पाटील यांच्या हस्ते हि कुस्ती लावली. पंच म्हणून अशोक पुजारी यांनी काम पहिले. मैदानात लहानमोठ्या १५० हून अधिक कुस्त्या झाल्या.

यावेळी कर्नाटक, महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन विविध कुस्ती संघटना अध्यक्ष पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. पंच म्हणून सागर मगदूम, बाळू जाधव, अशोक पुजारी, प्रकाश पुजारी, तानाजी बंडगर, विठ्ठल बंडगर, शिवाजी बंडगर यांनी काम पाहिले. कुस्ती यशस्वी पार पाडण्यासाठी बेडकिहाळ दसरा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थानी प्रयत्न केले. कुस्तीचे समालोचन शंकर पुजारी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT