ओव्हरटेकच्या प्रयत्नात तरुण जागीच ठार sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : अति घाई संकटात नेई; ओव्हरटेकच्या प्रयत्नात तरुण जागीच ठार

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला मोटर सायकलस्वार ट्रक खाली सापडल्याने जागीच ठार झाला.

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेला मोटर सायकलस्वार ट्रक खाली सापडल्याने जागीच ठार झाला. बुधवार (ता.२७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास अशोकनगर येथील कॅन्सर हॉस्पिटल नजीकच्या सेवा रस्त्यावर हा अपघात घडला. जोयेल गिल्बर्ट चिनीया (वय २७, रा. अशोकनगर) असे त्याचे नाव असून अपघाताची नोंद उत्तर वाहतूक पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, समोरून जाणाऱ्या ट्रकला जोयेल ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. अशोक नगर येथील कॅन्सर हॉस्पिटल नजीकच्या सेवा रस्त्यावरून सदर मालवाहू ट्रक महामार्गाकडे चालला होता. त्यावेळी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जोयेल याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने तो सरळ ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडला.

त्यावेळी ट्रक त्याच्या डोकीवरून गेल्याने चिरडून तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती समजताच उत्तर वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मात्र रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटवून न शकल्याने अनोळखीचा मृत्यू अशी नोंद करून घेऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवाआगारात ठेवण्यात आला होता. आज सकाळी त्यांची ओळख पटली. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे. शुक्रवार (ता. २९) सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT