rani channmma university sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव - विषय बदलीसाठी २ दिवस संधी द्या, महाविद्यालयांची RCU कडे मागणी

राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदवी शिक्षणात सक्ती असलेला कन्नड विषय बदलण्यासाठी

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव: राणी चन्नम्मा विद्यापीठाने पदवी शिक्षणात सक्ती असलेला कन्नड विषय बदलण्यासाठी शुक्रवारी (ता.4) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. मात्र, बेळगाव शहरातील काही मोजक्याच महाविद्यालयाना ही संधी देण्यात आली. इतर महाविद्यालयांचे सॉफ्टवेअर विद्यापीठानेच आज बंद ठेवले होते. त्यामुळे त्या महाविद्यालयाना विषय बदलताना अडचणी आल्या. विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे विषय बदलायचे सॉफ्टवेअर खुले करावे तसेच विषय बदलण्यासाठी आणखी दोन दिवस संधी द्यावी, अशी मागणी महाविद्यालयांकडून केली जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरनानुसार राज्यातील पदवी महाविद्यालयात कन्नड विषय सक्तीचा करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाच्या सूचनेनुसार ती सक्ती मागे घेण्यात आली. राणी चन्नम्मा विद्यापीठाने देखील ही सक्ती मागे घेतली असून गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळपर्यंत विषय बदलण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र, इतक्या कमी वेळेत विषय बदलताना देखील महाविद्यालयांना कसरत करावी लागली. अनेकांचे विषय बदली देखील झाले नाहीत. त्यांना आता कन्नड विषयातून परीक्षा द्यावी लागणार आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत दोनशेहून अधिक महाविद्यालय येतात. यातील बहुतांशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सक्ती असलेला कन्नड विषय बदलायचे होते. मात्र, विद्यापीठाने त्यांना ती संधीच न दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT