पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : 'चिक्कोडी-सदलगा' मध्ये 82 टक्के लसीकरण पूर्ण

आमदार गणेश हुक्केरी ; उपविभागात मतदार संघ अग्रस्थानी

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघात नागरिकांचे लसीकरण करण्याचा आपला उद्देश होता. त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आतापर्यंत 82 टक्के नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली.

आमदार हुक्केरी म्हणाले, चिक्कोडी-सदलगा मतदारसंघ आपल्या कुटुंबाप्रमाणे आहे. येथील प्रत्येक नागरिकांचा जीव मुख्य आहे. त्यामुळे माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांच्या मार्गदर्शनानुसार घेतलेल्या परिश्रमाला फळ मिळाले आहे. चिक्कोडी शहरात 94 टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. तर चिक्कोडी-सदलगा मतदार संघातील 82 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून चिक्कोडी उपविभागात लस घेतलेल्या यादीत चिक्कोडी-सदलगा मतदारसंघ अग्रस्थानी आहे.

लसीकरणाला प्रारंभ झालेल्या दिवसापासून मतदार संघातील प्रत्येक खेड्यात लस घेण्यासाठी जाणाऱ्यांना मोफत वाहनाची सोय केली होती. तसेच प्रकाश हुक्केरी यांच्या समवेत आपण आणि शेकडो कार्यकर्त्यांनी नागरिकात लस घेण्याबाबत जनजागृती केली आहे. या भागातील युवकांचे लसीकरण करण्यासाठी चिक्कोडी केएलई रुग्णालयात अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशनकडून 76 लाख रुपये खर्च करून 10 हजार लस खरेदी केल्या होत्या. राज्यात आपला मतदारसंघ लसीकरणात पहिल्यास्थानी घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असल्याने आरोग्य आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना सर्व पद्धतीच्या सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध आहोत. लवकरच मतदारसंघात शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT