Election on
Election on SAKAL
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : आयुक्तांच्या दौऱ्यानंतर तयारीला वेग

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक पथकाने राज्याचा दौरा केला आहे. या पथकाच्या दौऱ्यानंतर निवडणूक तयारीला चांगलाच वेग आला आहे. प्रशासकीय पातळीवर व्यापक तयारी व आढावा घेण्यास सुरु झाले आहे. संभाव्य उमेदवार आणि आमदारांच्या आर्थिक व्यवहारावर विशेष नजर ठेवण्यास सुरु केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि सहाय्यक आयुक्तांनी कर्नाटक राज्याचा दौरा केला आहे. तीन दिवसांच्या दौऱ्यात विविध महत्वाचे निर्णय घेतले आहे. महत्वाचे म्हणजे संभाव्य २ टप्प्यात निवडणूक होईल, असे मानले जात होते.

मात्र, आयोगाकडून एका टप्प्यात घोषित होण्याची शक्यता वर्तवली असून, त्यादिशेने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तयारी ठेवण्याचे आदेश बजाविले आहेत. मतदानाचा टक्का वाढविला जावा आणि मतदानाबाबत गोंधळ निर्माण होणार नाही, त्याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली आहे. त्यात मतदार ओळखपत्रांना आधारकार्डची जोड द्यावी,

असे सांगण्यात आले आहे. ८० पेक्षाअधिक वय आणि दिव्यांग मतदारांची यादी करून या स्वरुपाच्या मतदारांना टपालद्वारे मतदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे. यानुसार त्याची जिल्हा निवडणूक विभागाकडून यादी तयारी केली जात आहे. तपशील गोळा करून घरोघरी जाऊन त्यांना मतदान चिठ्ठी देण्यात येणार आहे. ‘सक्षम’ आणि ‘सुविधा’ ॲप विकसीत केले आहे. याबाबत मतदारांत जागृती करण्याचे निर्देश आहेत.

आर्थिक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना

भाजपच्या आमदाराचा मुलगा गेल्या आठवड्यात लोकायुक्त जाळ्यात सापडला. कोट्यावधी रुपये कारवाईत पथकाकडून जप्त केले आहे. त्यामुळे आगामी निवडणूक कालावधीत आर्थिक हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना बजाविल्या आहेत.

खासकरून इच्छूक आणि विद्यमान आमदारांवर लक्ष ठेवण्याबाबत सूचना आहेत. शिवाय मतदान यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्था याचा आढावा घेण्यात यावा. संवेदनशील मतदान केंद्रात अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT