Belgaum Boundary issue sakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : सीमाप्रश्र्नी ‘सर्वोच्च’ सुनावणी पुन्हा लांबणीवर

महाराष्ट्र सरकारने साक्षी पुरावे नोंदविण्याची तयारी पूर्ण केली आहे

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्र्नी बुधवारी (ता. ३०) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालीच नाही. खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने ही सुनावणी झाली नाही. मात्र, सुनावणी लवकरच होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने साक्षी पुरावे नोंदविण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाला दोन्ही राज्यांच्या सीमा निश्चित करण्याचा अधिकार नाही, असे सांगत कर्नाटक सरकारने सप्टेंबर २०१४ मध्ये अंतरिम याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय दावा पुढे जाणार नाही. त्यामुळे, अंतरिम अर्जावर लवकर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कर्नाटकच्या अंतरिम याचिकेवर २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती.

मात्र, खंडपीठातील न्यायमूर्ती उपस्थित राहू न शकल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने सुनावणी लवकर घेण्यात यावी यासाठी सरन्यायाधीशांकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर बुधवारी सीमाप्रश्नावर सुनावणी होती. मात्र त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने सुनावणी झाली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. राकेश द्विवेदी, ॲड. वैद्यनाथन व वकील ऑन रिकॉर्ड शिवाजी जाधव काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT