Exam
Exam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum : पहिल्या पेपरला १०५९ परीक्षार्थींची दांडी

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : बारावी परीक्षेला गुरुवारी प्रारंभ झाला. चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात ५३ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली. कन्नड व अरेबिक विषयाचे पेपर झाले. कन्नड विषयाला १०५९ परीक्षार्थी गैरहजर होते तर अरेबिक विषयाचे ३ परीक्षार्थी गैरहजर राहिले.

चिक्कोडी विभागात कन्नड विषयासाठी २४०३५ परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. त्यातील २२९७६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली तर १०५९ विद्यार्थी गैरहजर राहिले. अरेबिक विषयासाठी २३ विद्यार्थी होते. त्यातील २० जणांनी परीक्षा दिली तर ३ विद्यार्थी गैरहजर राहिले.

सकाळी परीक्षेच्या वेळेपूर्वी परीक्षार्थी केंद्रावर हजर झाले होते. पालकांचीही संख्या मोठी असल्याने केंद्रांबाहेर गर्दी होत होती. पोलिस बंदोबस्त काही केंद्रांवर होता. नियोजनाप्रमाणे प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांची तपासणी करून व प्रवेशपत्र पाहून प्रवेश दिला जात होता.

चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याने यापूर्वीच परीक्षेची तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार फिरते स्कॉड, स्थानिक स्कॉड यांची नियुक्ती केली असल्याने कुठेही गैरप्रकार आढळून आले नाहीत. प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्यासाठी वाहने व पोलिसांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी १०.१५ वाजता पेपर होता. त्यापूर्वीच विद्यार्थी केंद्रावर हजर होते. परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात प्रवेश बंदी केली होती.

चिक्कोडी जिल्ह्यात आठ तालुक्यांत या परीक्षा सुरू आहेत. गोकाक, मुडलगी, हुक्केरी, कागवाड, अथणी, रायबाग, निपाणी, चिक्कोडी तालुक्यांत परीक्षांचे नियोजन केले असून डीडीपीयुंकडून त्यावर नियंत्रण ठेवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT